16 positives throughout the day; 15 people defeated Corona | दिवसभरात १६ पॉझिटिव्ह; १५ जणांची कोरोनावर मात

दिवसभरात १६ पॉझिटिव्ह; १५ जणांची कोरोनावर मात

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून, मंगळवार, २७ आॅक्टोबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,२८६ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १२३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील तीन, तेल्हारा, जवाहर नगर, बाळापूर व साखरविरा ता. बार्शिटाकळी येथील प्रत्येकी दोन, ज्ञानेश्वर नगर, राऊतवाडी, रामदासपेठ , जोगळेकर प्लॉट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

१५ जणांना डिस्चार्ज
मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच, अवघाते हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून दोन, ओझोन हॉस्पीटल व हॉटेल रिजेन्सी येथून प्रत्येकी तीन व अकोला अ‍ॅक्सीडेंट क्लिनिक येथून दोन अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४९८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,२८६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,५१४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २७४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४९८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: 16 positives throughout the day; 15 people defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.