राज्यातील १६ लाख मृत्यू अप्रमाणित
By Admin | Updated: January 17, 2015 00:08 IST2015-01-17T00:08:29+5:302015-01-17T00:08:29+5:30
चार वर्षात ४0 टक्क्यांपेक्षा कमी मृत्यू नोंदणी

राज्यातील १६ लाख मृत्यू अप्रमाणित
नीलेश शहाकार/बुलडाणा:
मृत्यूच्या कारणांची खात्रीशीर व शास्त्रिय माहिती मिळवण्यासाठी ह्यमृत्यूच्या कारणांचे वैद्यकीय प्रमाणिकरण प्रमाणपत्रह्ण हे एकमेव साधन आहे; मात्र गत चार वर्षात राज्यात ४0 टक्क्यांपेक्षाही कमी मृत्यूंची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे १६ लाख ५१ हजार व्यक्तिंच्या मृत्यूंची कारणं वैद्यकीयदृष्ट्याप्रमाणित होऊ शकली नाही.
मृत्यूच्या घटना या लोकसंख्येवर, सामाजिक व आर्थिक परिणाम करणार्या असतात. बेवारस मृतदेह, आत्महत्या, विशिष्ठ रोग किंवा अपघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे शवविच्छेदन केले जाते. एखाद्याचा मृत्यू घरी झाल्यास, कुटुंबियांनी केलेल्या मृत्यू नोंदणीच्या आधारे वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करुन मृताचे वय, लिंग आणि मृत्यूचे कारण आदी माहितीच्या आधारे मृताच्या आरोग्याची स्थिती काय होती, हे स्पष्ट होते.
महानिबंधक, नवी दिल्ली यांनी देशभरातील मृत्यू प्रकरणांच्या कारणांची माहिती मिळवण्यासाठी ह्यमृत्यूच्या कारणांचे वैद्यकीय प्रमाणिकरण योजनाह्ण अंमलात आणली. नगरपरिषद, महानगरपालिका, प्रसुतीगृह, खासगी व शासकीय रुग्णालय, संस्था आदींना या योजनेखाली आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यांच्याकडून संबंधिताच्या मृत्यूचे वैद्यकीय कारण शोधून, तो मृत्यू वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित करण्यात येतो. या आधारे शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मृत्यूच्या वैद्यकिय प्रमाणिकरण प्रमाणपत्राची सांख्यिकीय माहिती तयार केली आहे. त्यानुसार राज्यात गत चार वर्षात २५ लाख ४ हजार ९४७ मृत्यूची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी केवळ ८ लाख ५३ हजार ५३८ व्यक्तिंच्या मृत्यूचे कारण शोधून, त्यांना वैद्यकिय प्रमाणपत्र देण्यात आले आहे. उर्वरित १६ लाख ५१ हजार ४00 मृत्यू आजही अप्रमाणित असल्याचे पुढे आले आहे.
*नोंदणी करण्यास अडचण
मृत्यूच्या कारणांचे वैद्यकीय प्रमाणिकरण या योजनेअंतर्गत फक्त रूग्णालय स्तरावर झालेला मृत्यू व नोंदणी झालेल्या मृत्यूची माहिती एकत्रित करण्यात येते. या आधारे मृत्यूच्या घटनांची व मृत्यू प्रमाणपत्राबाबत पूर्ण सांख्यिकीय माहिती तयार करता येत नाही. आजही घरी, अथवा वैद्यकीय सेवा न मिळाल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा प्रकारच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वैद्यकीय प्रमाणिकरण करताना अनेक अडचणी येतात.
बॉक्स
वर्ष मृत्यू प्रमाणपत्र टक्केवारी
२0१ १ ६0८५९८ २१५0४५ ३५.३
२0१२ ६२९७६0 २१२३३५ ३४.६
२0१३ ६३३२0६ २१२३३५ ३३.५३
२0१४ ६३३३८३ २१३८२६ ३२.२३