शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

१५ कोटींचे प्रस्ताव; आयुक्त म्हणतात सांगता येत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 10:29 IST

या संपूर्ण प्रकरणात भाजप आयुक्तांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र आहे.

अकोला : शहरातील पश्चिम मतदारसंघातील विकास कामांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या १५ कोटींच्या विकास कामांचा मार्ग मोकळा न करता मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी दिलेल्या अहवालात तांत्रिक मुद्दा उपस्थित करीत १५ कोटींच्या कामांना खीळ घातल्याचे समोर आले आहे. भविष्यात गटार योजना, पाणीपुरवठा योजनेची कामे करताना रस्त्यांची कामे क्षतिग्रस्त होतील किंवा नाही, याबाबत स्पष्ट अभिप्राय न देता आयुक्तांनी याबाबत सांगता येत नाही, असे मोघम मत नमूद केल्याने शिवसेनेत तीव्र नाराजी निर्माण झाल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणात भाजप आयुक्तांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र आहे.मनपा क्षेत्रातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी राज्य शासनाने १७ जुलै रोजी मूलभूत सोयी-सुविधा अंतर्गत १५ कोटींचा विशेष निधी मंजूर केला. निधी मंजूर होताच शिवसेनेच्या आठ नगरसेवकांसह भाजपचे २७ व काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागात विकास कामे प्रस्तावित करण्यात आली. सदर प्रस्ताव शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केल्यावर या विभागाने स्थळपाहणी केली. तसेच तांत्रिक मान्यता प्रदान केली. यादरम्यान, सेना नगरसेवकांच्या वाटेला गेलेली कामे रद्द करण्याची मागणी लावून धरत भाजपने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. दुसरीकडे मनपाकडून १५ कोटींच्या प्रस्तावांना सरळ पद्धतीने नाहरकत प्रमाणपत्र देण्याची गरज असताना तसे न करता प्रशासनाने मोघम उत्तर नमूद केल्याने १५ कोटींच्या विकासकामांना खीळ बसण्याची चिन्ह आहेत.नियमबाह्य ठरावाचा उल्लेख कसा?सर्वसाधारण सभेच्या मान्यतेशिवाय शहरातील विकास कामांना मंजुरी देता येणार नाही, असा प्रस्ताव २ जुलै २०२० रोजीच्या सभेत मंजूर केल्याचा दावा सत्ताधारी भाजपकडून केला जात असून त्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. आयुक्तांनी १५ कोटींच्या प्रस्तावातही नियमबाह्य ठरावाचा आधार घेतला. अशा नियमबाह्य ठरावाचा उल्लेख केलाच कसा, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोलाBJPभाजपाShiv Senaशिवसेना