२१ संचालक पदांसाठी १४१ नामनिर्देशनपत्र दाखल

By Admin | Updated: April 9, 2015 02:55 IST2015-04-09T02:55:17+5:302015-04-09T02:55:17+5:30

जिल्हा बँक निवडणूक : अध्यक्षांसह सहा अविरोध

141 nomination papers for 21 posts of directors | २१ संचालक पदांसाठी १४१ नामनिर्देशनपत्र दाखल

२१ संचालक पदांसाठी १४१ नामनिर्देशनपत्र दाखल

अकोला: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ९४ उमेदवारांचे १४१ नामनिर्देशनपत्र दाखल झाले. त्यामध्ये बँकेचे विद्यमान अध्यक्षांसह सहा उमेदवारांविरुद्ध नामनिर्देशनपत्र दाखल झाले नसल्याने, या सहा उमेदवारांची बँकेच्या संचालक पदांसाठी अविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता उर्वरित १५ संचालकपदांसाठीच मतदान होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार शेवटचा दिवस होता. त्यामध्ये अकोला, बाश्रीटाकळी, आकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा तसेच अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग, महिला प्रतिनिधी मतदारसंघासह कृषी पणन-शेतीमाल प्रक्रिया संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि जिल्हा सहकारी बोर्ड मतदारसंघ, औद्योगिक, मजुरांच्या, विणकरांच्या संस्था, प्रिंटिंग प्रेस आणि हयात असलेले वैयक्तिक भागधारक मतदारसंघ व पगारदार नोकरांच्या पतसंस्था, नागरी सहकारी बँका, ग्रामीण व नागरी सह.पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मतदारसंघ इत्यादी २0 मतदारसंघातून २१ संचालकांपदांसाठी ९४ उमेदवारांचे १४१ नामनिर्देशनपत्र दाखल झाले. अकोला मतदारसंघात बँकेचे विद्ममान अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, बाळापूर मतदारसंघात राजेश राऊत, पातूर मतदारसंघात जगदीश पाचपोर, मूर्तिजापूर मतदारसंघात सुहासराव तिडके, रिसोड मतदारसंघात अमित झनक आणि औद्योगिक, मजुरांच्या, विणकरांच्या संस्था, प्रिंटिंग प्रेस आणि वैयक्तिक भागधारक मतदारसंघात वामनराव देशमुख यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे त्यांची अविरोध निवड झाली आहे. त्यांच्या अविरोध निवडीची घोषणा निकालाच्या दिवशी ७ मे रोजी करण्यात येणार आहे.

Web Title: 141 nomination papers for 21 posts of directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.