बाहेरगावाहून जिल्ह्यात परतणार १,४०० व्यक्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 17:48 IST2020-05-15T17:48:01+5:302020-05-15T17:48:29+5:30
इतर जिल्ह्यात अडकलेले १ हजार ४०० नागरिक बाहेरगावाहून जिल्ह्यात परतणार आहेत.

बाहेरगावाहून जिल्ह्यात परतणार १,४०० व्यक्ती!
अकोला : ‘लॉकडाउन’मध्ये जिल्ह्यातील राज्यातील इतर जिल्ह्यात अडकलेले १ हजार ४०० नागरिक बाहेरगावाहून जिल्ह्यात परतणार आहेत. त्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास हरकत नसल्याचे प्रमाणपत्र (एनओसी) प्राप्त झाले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात लागू असलेल्या ‘लॉकडाउन’मध्ये राज्यातील विविध भागात जिल्ह्यातील व्यक्ती अडकले आहेत. ‘लॉकडाउन’मध्ये अडकलेल्या व्यक्तींना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील इतर जिल्ह्यात अडकलेले १ हजार ४०० व्यक्ती लवकरच जिल्ह्यात परतणार आहेत. संबंधित व्यक्तींना जिल्ह्यात पाठविण्यासाठी हरकत नसल्याचे प्रमाणपत्र (एनओसी) संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये बाहेरगावी अडकलेले जिल्ह्यातील नागरिक लवकरच जिल्ह्यात परतणार आहेत.
‘लॉकडाउन’मध्ये इतर जिल्ह्यात अडकलेले जिल्ह्यातील १ हजार ४०० व्यक्ती लवकरच जिल्ह्यात परतणार आहेत. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘एनओसी’ प्राप्त झाली आहे.
-संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी.