दुचाकीने १४ वर्षीय बालकास उडवले!

By Admin | Updated: February 11, 2017 02:44 IST2017-02-11T02:44:41+5:302017-02-11T02:44:41+5:30

महान-मंगरुळपीर मार्गावरील ढाब्यासमोर घटना घडली.

14-year-old boycotted by two-wheeler bike! | दुचाकीने १४ वर्षीय बालकास उडवले!

दुचाकीने १४ वर्षीय बालकास उडवले!

महान(अकोला), दि. १0- एका मोटारसायकलस्वाराने महान येथील १४ वर्षीय बालकास उडवून जखमी केल्याची घटना महान-मंगरुळपीर मार्गावरील ढाब्यासमोर शुक्रवारी घडली.या घटनेत मोटारसायकलस्वारदेखील जखमी झाला आहे. महानमधील वेल्डिंग वर्कशॉपवर काम करणारा गोपाल वाघमारे हा मोटारसायकलने महानवरून वस्तापूरकडे जात होता. त्यावेळी औषधी आणण्याकरिता मेडिकल स्टोअर्सवर येत असलेल्या मो. मुशर्रफ मो. युसूफ या १४ वर्षीय मुलाला त्याने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.

Web Title: 14-year-old boycotted by two-wheeler bike!