शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

मदत वाटपासाठी १.३० लाख शेतकऱ्यांच्या याद्या कोषागारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 11:02 IST

याद्यानुसार १३१ कोटी ९८ लाख ३७ हजार रुपये मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया बुधवार, १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी दुसºया टप्प्यात १५८ कोटी ५४ लाख ८१ हजार रुपयांची मदत शासनामार्फत प्राप्त झाली असून, उपलब्ध मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख ३० हजार ७०० शेतकºयांच्या याद्या १७ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा कोषागारात सादर करण्यात आल्या आहेत. याद्यानुसार १३१ कोटी ९८ लाख ३७ हजार रुपये मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया बुधवार, १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील १०६ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी १८ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. शेतकºयांना मदत वाटप करण्याच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांची मदत गत १९ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मदत वाटपाच्या दुसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी १५८ कोटी ५४ लाख ८१ हजार रुपयांची मदत शासनामार्फत १३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरीत करण्यात आलेली मदतीची रक्कम अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी तहसील कार्यालयांमार्फत जिल्ह्यातील ५२० गावांमधील १ लाख ३० हजार ७०० शेतकºयांच्या याद्या तयार करून १७ डिसेंबर रोजी जिल्हा कोषागारात सादर करण्यात आल्या. या याद्यानुसार शेतकºयांच्या बँक खात्यात १३१ कोटी ९८ लाख रुपये मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद