१३ युवकांचा देहदानाचा, तर ५२ युवकांचा नेत्रदानाचा संकल्प

By Admin | Updated: April 17, 2017 19:44 IST2017-04-17T19:44:10+5:302017-04-17T19:44:10+5:30

अकोला- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरी येथील छत्रपती ग्रुपच्यावतीने १३ युवकांनी देहदानाचा, तर ५२ जणांनी नेत्रदानाचा संकल्प करून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना दिली.

13 youths 'award, 52 youths' eyesight | १३ युवकांचा देहदानाचा, तर ५२ युवकांचा नेत्रदानाचा संकल्प

१३ युवकांचा देहदानाचा, तर ५२ युवकांचा नेत्रदानाचा संकल्प

छत्रपती ग्रुपचा उपक्रम : संकल्पपत्र जिल्हा शल्य चिकित्सकांना सादर

अकोला : समाजासाठी काही तरी करावे, या उद्देशाने येथून जवळच असलेल्या कान्हेरी येथील छत्रपती ग्रुपच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कायÊक्रमात १३ युवकांनी देहदानाचा, तर ५२ जणांनी नेत्रदानाचा संकल्प करून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना दिली.
मानवी अवयवांना पयाÊय नाही, ते कोणत्याही कारखान्यात तयार करता येत नाहीत. त्यामुळे निकामी झालेल्या अवयवाची जागा केवळ दुसऱ्या अवयवानेच भरून निघते. ‘मरावे परी अवयव रूपी उरावे’ या उक्तीनुसार देहदान व अवयव दानाची चळवळ दृढ होत आहे. या अनुषंगाने कान्हेरी येथील छत्रपती ग्रुपने १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अवयवदान संकल्प सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात ग्रुपच्या सवÊ सदस्यांनी व गावकऱ्यांनी देहदान व अवयव दानाचा संकल्प केला. यावेळी १३ युवकांनी देहदानाचे संकल्प अजÊ भरले, तर ५२ जणांनी नेत्रदानाचे संकल्प अजÊ भरले. दरम्यान, ग्रुपच्या सदस्यांनी सोमवारी हे सवÊ संकल्पपत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या सुपूदÊ केले.

 

Web Title: 13 youths 'award, 52 youths' eyesight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.