१३ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: March 15, 2016 02:15 IST2016-03-15T02:15:15+5:302016-03-15T02:15:15+5:30
खामगावातील घटना.

१३ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
खामगाव : स्थानिक गजानन कॉलनीमधील रहिवासी यश गजानन काळे या १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
गजानन कॉलनीमध्ये पिंप्री गवळी येथील गजानन काळे यांची मुलं शिक्षणासाठी भाड्याचे घर करुन राहतात. १४ मार्च रोजी काळे यांचा लहान मुलगा यश याने दुपारी गळपास घेऊन आ त्महत्या केली. यश हा खामगाव येथील न्यू ईरा हायस्कूलमध्ये ७ व्या वर्गात शिकत होता. यशच्या आत्महत्येची बातमी कळताच पिंप्री गवळी येथील गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाइकांनी यावेळी आक्रोश केला. शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन यशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर यशवर पिंप्री गवळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धंदरे करीत आहेत.