पायदळ दींडीत जाण्यास मनाई केल्याचा राग मनात धरून १३ वर्षीय मुलाने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 18:52 IST2018-02-07T16:02:04+5:302018-02-07T18:52:04+5:30
तेल्हारा : श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त मुंडगाव येथील मंदिरात दर्शनासाठी पायदळ वारीत जाण्यास कुटुंबियांनी मनाई केल्याचा राग मनात धरून तेल्हारा तालुक्यातील अकोली (रुपराव) येथील एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, ७ फेब्रुवारी रोजी घडली.

पायदळ दींडीत जाण्यास मनाई केल्याचा राग मनात धरून १३ वर्षीय मुलाने केली आत्महत्या
तेल्हारा (जि. अकोला) : श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त मुंडगाव येथील मंदिरात दर्शनासाठी पायदळ वारीत जाण्यास कुटुंबियांनी मनाई केल्याचा राग मनात धरून तेल्हारा तालुक्यातील अकोली (रुपराव) येथील एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, ७ फेब्रुवारी रोजी घडली. ओम श्रीकृष्ण ढोकणे असे या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे प्रकट दिनाच्या दिवशी गावावर शोककळा पसरली आहे.
श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन ७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र मोठ्या भक्तीभावात साजरा केला जात आहे. प्रकट दिनानिमित्त मुंडगाव येथील संत गजानन महाराज पादुका संस्थान येथे अनेक भाविक दर्शनासाठी जात असतात.
अकोली रुपराव येथील श्रीकृष्ण ढोकणे यांच्या १३ वर्षीय ओम याने बेलखेड येथे ७ फेब्रुवारीला साजºया होणाºया संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सवात सहभागी होण्यासाठी पायदळ जाण्याचा हट्ट ६ फेब्रुवारी रोजी धरला होता; परंतु घरच्या लोकांनी त्याला बेलखेडला पायदळ जाऊ दिले नव्हते. यामुळे ओम कालपासूनच नाराज होता. दरम्यान, बुधवारी सकाळी घरच्यांनी त्याला शाळेत जाण्यास सांगितले. परंतु, कालच्या प्रकाराने व्यथित झालेल्या ओमने शाळेत जाण्यास नकार दिला. यामुळे घरच्यांनी ओमला खडसावले. याचा राग मनात धरून ओमने त्याच्या घराच्या बाजूला असलेल्या गायवाड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच घरच्या मंडळींनी ओमला तातडीने तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ओम हा घरात सर्वात लहान व लाडाचा होता. त्यामुळे घरच्यांना त्याच्या मृत्यूने फार मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मुत्यूने आकोली (रूपराव) गावावर शोककळा पसरली आहे. ओमच्या मित्रांना व शिक्षकांनासुद्धा त्याच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)