डीपीसीवर जिल्हा परिषदेचे १३ सदस्य अविरोध
By Admin | Updated: March 4, 2015 02:21 IST2015-03-04T02:21:57+5:302015-03-04T02:21:57+5:30
एका पदासाठी होणार निवडणूक.

डीपीसीवर जिल्हा परिषदेचे १३ सदस्य अविरोध
अकोला : जिल्हा नियोजन समितीतील (डीपीसी) सदस्यांच्या १४ जागांच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या ३0 सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १५ जणांनी अर्ज मागे घेतल्याने १३ जणांची अविरोध निवड झाली असून, केवळ एका जागेसाठी आता निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी १५ उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद सदस्यांमधून १४ सदस्यांची निवड करायची आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १४ पदांसाठी ३0 जिल्हा परिषद सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवार, ३ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. तोपर्यंत १५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.