१३ महसूल अधिका-यांनी सोडली गॅस सिलिंडर ‘सबसिडी’

By Admin | Updated: August 28, 2015 01:04 IST2015-08-28T01:04:24+5:302015-08-28T01:04:24+5:30

जिल्हाधिका-यांच्या सूचनेला प्रतिसाद.

13 cylinders subsidized by revenue officials | १३ महसूल अधिका-यांनी सोडली गॅस सिलिंडर ‘सबसिडी’

१३ महसूल अधिका-यांनी सोडली गॅस सिलिंडर ‘सबसिडी’

अकोला: जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या सूचनेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १३ महसूल अधिकर्‍यांनी गॅस सिलिंडरची सबसिडी सोडण्याचा निर्णय गुरुवारी घेतला असून, याबाबतचे पत्र जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आले. सबसिडी सोडणार्‍यांमध्ये उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांचा समावेश आहे. गॅस सिलिंडर सबसिडीचा गरीब कुटुंबांना लाभ मिळावा, यासाठी, ह्यगिव्ह इट अपह्ण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील महसूल अधिकार्‍यांनी गॅस सिलिंडरची सबसिडी सोडण्याची सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी महसूल अधिकार्‍यांच्या बैठकीत केली होती. जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेला प्रतिसाद देत तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना जिल्हा शाखेच्यावतीने गुरुवारी गॅस सिलिंडरची सबसिडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सबसिडी सोडल्याचे पत्रही संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले. सबसिडी सोडणार्‍यांमध्ये जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार व नायब तहसीलदार मिळून १३ महसूल अधिकार्‍यांचा समावेश आहे.

Web Title: 13 cylinders subsidized by revenue officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.