एकाच दिवशी १२५६ मालमत्तांची मोजणी
By Admin | Updated: May 8, 2015 01:46 IST2015-05-08T01:46:37+5:302015-05-08T01:46:37+5:30
अकोला शहरातील मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकन मोहिमेला वेग.

एकाच दिवशी १२५६ मालमत्तांची मोजणी
अकोला : शहरातील मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकन मोहिमेला वेग आला असून, गुरुवारी एकाच दिवशी १ हजार २५६ मालमत्तांची मोजणी करण्याव्यतिरिक्त १ हजार १८४ मालमत्तांना नवीन क्रमांक देण्याचे काम मनपा कर्मचार्यांनी चोख बजावले. यावेळी उपायुक्त माधुरी मडावी यांनी उपस्थित राहून मालमत्तांची पाहणी करीत कर्मचार्यांना निर्देश दिले. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी उपायुक्त माधुरी मडावी यांनी ठोस कार्यक्रम हाती घेतला. मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाची मोहीम मडावी यांनी सुरु केली. यापूर्वी १९९८ मध्ये पुनर्मूल्यांकन करण्यात आले होते. मडावी यांनी दक्षिण झोनमधील मालमत्तांचे मोजमाप व त्यांना नवीन मालमत्ता क्रमांक देण्यासाठी विविध पथकांचे गठन केले. ३0 एप्रिलपासून ते आजपर्यंत ६ हजारपेक्षा अधिक मालमत्तांची मोजणी करण्यात आली असून, २८ एप्रिलपासून १0 हजार ३८0 पेक्षा अधिक मालमत्तांना नवीन क्रमांक देण्यात आले आहेत. दक्षिण झोनमध्ये पुनर्मूल्यांकनांची प्रक्रिया आटोपल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर झोनमध्ये ही मोहीम राबवल्या जाईल. अतिशय नियोजनरीत्या गठित करण्यात आलेल्या पथकांनी गुरुवारी एकाच दिवशी १ हजार २५६ मालमत्तांचे मोजमाप केले.