कोविड भत्ता मिळत नसल्याने १२० डॉक्टरांचा सेवेस नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 02:33 AM2020-10-03T02:33:32+5:302020-10-03T02:34:03+5:30

अकोला जिल्हाधिकाऱ्यांना दिला प्रस्ताव

120 doctors refused service due to non-receipt of covid allowance | कोविड भत्ता मिळत नसल्याने १२० डॉक्टरांचा सेवेस नकार

कोविड भत्ता मिळत नसल्याने १२० डॉक्टरांचा सेवेस नकार

Next

अकोला : कोविड भत्ता मिळत नसल्याने येथील वैद्यकीय महाविद्यालयातील १२० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोविड वार्डात रुग्णसेवा देण्यास नकार दिला आहे. कोविड वार्डात रुग्णसेवा द्यावी म्हणून जीएमसी प्रशासनाकडून कारवाईचा धाक दाखविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सर्वोपचार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर मागील सहा महिन्यांपासून नॉन कोविडसह कोविड वार्डातही निरंतर रुग्णसेवा देत आहे. कोविडमध्ये रुग्णसेवा देणाºया प्रत्येक डॉक्टरला कोविड भत्ता दिला जातो. राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनाही हा भत्ता लागू आहे; असे असताना आम्हाला का वंचित ठेवले जात आहे, असा प्रश्न या डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.

जीएमसी प्रशासनाने अद्यापही जिल्हाधिकाऱ्यांकडे कोविड भत्त्याचा प्रस्ताव न दिल्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी गुरुवारी स्वत:च जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन कोविड भत्त्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी दिली. प्रशिक्षणार्थी डॉक्टर रात्रंदिवस कोविड वार्डात रुग्णसेवा देत आहेत. रुग्णसेवा देताना आतापर्यंत १६ प्रशिक्षणार्थी डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत. यातील काही डॉक्टरांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली आहे.

Web Title: 120 doctors refused service due to non-receipt of covid allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app