१२ वर्षीय मुलीवर तरूणाचा बलात्कार
By Admin | Updated: November 14, 2014 00:13 IST2014-11-14T00:13:22+5:302014-11-14T00:13:22+5:30
नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथील घटना, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

१२ वर्षीय मुलीवर तरूणाचा बलात्कार
नांदुरा (बुलडाणा) : एका १२ वर्षीय मुलीवर तरूणाने बलात्कार केल्याची घटना नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे बुधवारी घडली.
पीडित मुलीची आई १२ नोव्हेंबर रोजी कामासाठी बाहेर गेली होती. तिची मुलगी घरी एकटीच होती. त्यावेळी दुपारी १ वाजताच्या सुमारास गावातील विनोद विश्वनाथ बगाडे याने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. यासंदर्भात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* २२ वर्षीय महिलेचा विनयभंग
सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव येथील एका २२ वर्षीय महिलेचा गावातीलच युवकाने घरात घुसून विनयभंग केल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजता घडली. यासंदर्भात युवकाविरुद्ध किनगावराजा पोलिसांनी १३ नोव्हेंबर रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.