पोलिसांकडून १२ संशयितांची झाडाझडती

By Admin | Updated: June 15, 2015 01:44 IST2015-06-15T01:44:17+5:302015-06-15T01:44:17+5:30

साडेतीन लाखांची रोकड लुटमार प्रकरण

12 suspects blown out of police | पोलिसांकडून १२ संशयितांची झाडाझडती

पोलिसांकडून १२ संशयितांची झाडाझडती

अकोला - हुंडीचिठ्ठीचे व्यापारी अरुण अग्रवाल यांच्या कामगाराच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून सुमारे साडेतीन लाख रुपयांची रोकड लुटमारप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी शनिवारी रात्रीपासून रविवारपर्यंंत १२ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडती घेतली. मात्र, त्यांच्याकडून या प्रकरणाची कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नसल्याने या प्रकरणाचा तपास शून्य होता.
हुंडीचिठ्ठीचे व्यापारी अरुण अग्रवाल यांच्या कामावरील राऊत नामक कामगार शनिवारी रात्री सुमारे साडेतीन लाख रुपयांची रोकड घेऊन खोलेश्‍वर परिसरातील सरकारी बगिच्याजवळून अँक्टीव्हा दुचाकीने जात असताना येथूनच पायदळ जात असलेल्या दोघांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला होता.
या घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपींचा शोध सुरू केला. मात्र, पोलिसांना कोणतीही ठोस माहिती हाती लागली नाही. शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास ४ ते ५ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली.मात्र, या चोरीची माहिती पोलिसांना मिळाली नाही. त्यानंतर रविवारी सिटी कोतवाली पोलिसांनी तब्बल १२ संशयितांना ताब्यात घेऊन या लुटमारप्रकरणाशी त्यांचा संबंध शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या संशयितांचा सदर प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले .

Web Title: 12 suspects blown out of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.