१२ तास भारनियमनाने गडंकी येथील ग्रामस्थ त्रस्त
By Admin | Updated: July 10, 2014 01:28 IST2014-07-10T01:19:53+5:302014-07-10T01:28:59+5:30
अकोला महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा

१२ तास भारनियमनाने गडंकी येथील ग्रामस्थ त्रस्त
अकोला: दररोज बारा-बारा तास होत असलेल्या भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या गडंकी येथील नागरिकांनी बुधवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान महावितरणच्या गोरक्षण रोडवरील ग्रामीण कार्यालयावर मोर्चा काढला. गावकर्यांनी महावि तरणच्या कार्यालयाची दारे बंद करून अधिकारी, कर्मचार्यांना बाहेर जाऊ दिले नाही.
गडंकीसह आजूबाजूच्या गावात दररोज बारा-बारा तास भारनियमन करण्यात येते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अडचणी येत आहेत. सध्या ग्रामीण भागात ह्यबाईकर्स गँगह्णची दहशत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे संपूर्ण गावात अंधार असतो. त्यामुळे गावात चोर्याही वाढल्या आहेत. गावातील भारनियमन कमी करण्यासाठी कर्मचार्यांपासून तर अधिकार्यांना अनेक निवेदने देण्यात आली. मात्र त्याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांनी बुधवारी सरळ कार्यालयावर धडक दिली. यावेळी कार्यालयात एकही अधिकारी हजर नव्हता. तर मोर्चेकर्यांनी अधिकार्यांशी संपर्क केला असता त्यांचे फोनही घेण्यात आले नाही.