शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

सावकारांनी बळकावलेली ११५ एकर जमीन २२ शेतकऱ्यांना परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 10:59 AM

अकोला : अवैध सावकारीतून सावकारांनी बळकावलेली ११५ एकर १३ आर जमीन सहकार विभागाच्या जिल्हा उप-निबंधक कार्यालयामार्फत २२ शेतकऱ्यांना मार्च अखेरपर्यंत परत करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हा उप-निबंधक (सहकारी संस्था )कार्यालय अंतर्गत गत वर्षभरात अवैध सावकारीचे ६५ प्रकरणे दाखल करण्यात आली. अवैध सावकारीतून सावकारांनी २२ शेतकऱ्यांची बळकावलेली ११५ एकर १३ आर जमीन संंंंंबंधित शेतकºयांना परत करण्यात आली. १४ प्रकरणांत जिल्हा उप-निबंधकांकडे अद्याप सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे.

- संतोष येलकर

अकोला : अवैध सावकारीतून सावकारांनी बळकावलेली ११५ एकर १३ आर जमीन सहकार विभागाच्या जिल्हा उप-निबंधक कार्यालयामार्फत २२ शेतकऱ्यांना मार्च अखेरपर्यंत परत करण्यात आली. परत करण्यात आलेल्या जमिनीचा सात-बारा संबंधित शेतकºयांच्या नावाने करण्यात आला आहे.जिल्हा उप-निबंधक (सहकारी संस्था )कार्यालय अंतर्गत गत वर्षभरात अवैध सावकारीचे ६५ प्रकरणे दाखल करण्यात आली. दाखल प्रकरणांपैकी २२ प्रकरणांत गत मार्च अखेरपर्यंत आदेश पारित करण्यात आले. त्यामध्ये अवैध सावकारीतून सावकारांनी २२ शेतकºयांच्या बळकावलेल्या जमिनी परत करण्याचे आदेश देण्यात आले, तसेच अवैध सावकारीतून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्यासंदर्भात संबंधित सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. मार्च अखेरपर्यंत अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात अवैध सावकारीतून सावकारांनी २२ शेतकऱ्यांची बळकावलेली ११५ एकर १३ आर जमीन संंंंंबंधित शेतकºयांना परत करण्यात आली असून, जमिनींचा सात-बारा संबंधित शेतकऱ्यां च्या नावाने करण्यात आला आहे. जमीन परत मिळाल्याने, सावकारग्रस्त शेतकºयांना दिलासा मिळाला.२० प्रकरणे खारीज; ९ प्रकरणे फेटाळली !अवैध सावकारीसंदर्भात जिल्हा उप-निबंधक (सहकारी संस्था ) कार्यालय अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये २० प्रकरणे कालमर्यादा बाहेरील (१५ वर्षांपूर्वीची )असल्याने, अवैध सावकारीची ही २० प्रकरणे जिल्हा उप-निबंधक कार्यालयामार्फत खारीज करण्यात आली आहेत, तर अवैध सावकारीची ९ प्रकरणे कायदेशीर नसल्याने ही प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत.१४ प्रकरणांत सुनावणी सुरू!अवैध सावकारीच्या प्रकरणांत जिल्हा उप-निबंधक (सहकारी संस्था ) अंतर्गत दाखल प्रकरणांपैकी १४ प्रकरणांत जिल्हा उप-निबंधकांकडे अद्याप सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. अवैध सावकारीच्या या १४ प्रकरणांत जिल्हा उप-निबंधकांमार्फत लवकरच आदेश पारित करण्यात येणार आहेत.अवैध सावकारीच्या प्रकरणांत दाखल प्रकरणांपैकी मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात अवैध सावकारीतून सावकारांनी बळकावलेली २२ शेतकºयांची ११५ एकर १३ आर शेतजमीन शेतकºयांना परत करण्यात आली. जमिनींचा सात-बारा संबंधित शेतकºयांच्या नावावर करण्यात आला, तसेच शेतकºयांची जमीन बळकावणाऱ्या संबंधित सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.-जी.जी.मावळे, जिल्हा उप-निबंधक (सहकारी संस्था )

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयagricultureशेती