११ नामनिर्देशनपत्र अवैध
By Admin | Updated: April 9, 2015 02:55 IST2015-04-09T02:55:55+5:302015-04-09T02:55:55+5:30
अकोला जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायत निवडणूक

११ नामनिर्देशनपत्र अवैध
अकोला: जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी दाखल झालेल्या ६३ नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवारी तहसील कार्यालयांमध्ये करण्यात आली. त्यामध्ये ११ नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले. जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या ६४ प्रभागात ६७ जागांच्या पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. त्यामध्ये वारखेड, हिंगणी खुर्द, पिंपरखेड, मनात्री बु., धोंडा आखर, भिली, शेरी बु., देऊळगाव, अकोली जहाँगीर, जितापूर, शहापूर, टाकळी खुर्द, बोरगाव निंघोट, कव्हळा, माना, वाई (माना), लाखोंडा, काटीपाटी, आपोती बु., मासा, अनकवाडी, वडद, आपातापा, रामगाव, निराट, अमानतपूर, तामशी वाळकी, नवथळ, सातरगाव, बहादुरा, टाकळी खोजबळ, शिंगोली, कुपटा, कोसगाव, तुलंगा बु., सांगोळा पांढुर्णा इत्यादी ३७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे. या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा मंगळवार, ७ एप्रिल शेवटचा दिवस होता. त्यामध्ये आकोट, मूर्तिजापूर, अकोला, बाळापूर व पातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ६३ नामनिर्देशनपत्र दाखल झाले. दाखल झालेल्या नामनिर्देशपत्रांची छाननी ८ एप्रिल रोजी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये करण्यात आली.