अकोला, दि. १३- स्थानिक गुन्हे शाखेचा ढेपाळलेला कारभार सुधारण्यासाठी जिल्हय़ातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या ११ पोलीस कर्मचार्यांची निवड स्थानिक गुन्हे शाखेत करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या आदेशानंतर या कर्मचार्यांची यादी जाहीर करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेत वर्णी लागलेल्या ११ पोलीस कर्मचार्यांमध्ये अकोट फैल पोलीस स्टेशनमधील शेर अली, फिरोज इस्माइल, बाळापूरमधील प्रमोद डोईफोडे, शंकर डाबेराव, सिटी कोतवालीतील नीलेश गोरे, माजीद शेख, अकोट शहर पोलीस स्टेशनमधील संतोष गावंडे आणि संदीप काटकर, मूर्तिजापूर ग्रामीणमधील सुभाष अवचार, जुने शहर पोलीस स्टेशनमधील राजेंद्र सोनवणे, माना पोलीस स्टेशनमधील अमित दुबे यांची स्थानिक गुन्हे शाखेत वर्णी लागली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे कामकाज पूर्णत: ढेपाळल्यानंतर येथील कामकाज सुधारण्यासाठी या कर्मचार्यांची निवड करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेवर ११ नवे पोलीस; एसपींनी केली निवड
By admin | Updated: November 14, 2016 03:03 IST