रेशीम उद्योगासाठी ११ कोटी २४ लाखाचा निधी
By Admin | Updated: January 13, 2015 01:37 IST2015-01-12T23:21:30+5:302015-01-13T01:37:38+5:30
शेतक-यांना दिलासा; उद्योगाला बळकटी मिळणार.

रेशीम उद्योगासाठी ११ कोटी २४ लाखाचा निधी
खामगाव (बुलडाणा) : रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने ११ कोटी २४ लाख रु पयांच्या निधी वितरणाला नुकतीच मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील रेशीम उद्योगाच्या बळकटीचा मार्ग मोकळा झाला असून पुरक व्यवसाय करणार्या शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या सीडीपी (रेशीम उद्योग विकास) या योजनेतंर्गत सन २0१४-१५ करीता वस्त्रोद्योग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून रेशीम उद्योग विकासासाठी दोन टप्प्यामध्ये ७४६.४४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे या योजनेसाठी राज्यशासनाचा हिश्याचा ३७८.३६ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यासाठी राज्य शासनाने ९ जानेवारीच्या अध्यादेशानुसार मंजुरी दिली आहे.
सदर निधीची अनुदान रक्कम लाभार्थ्यांच्या बॅक खात्यावर वर्ग होतील, याची दक्षता घेण्याचे निर्देशही राज्य शासनाने दिले असून कोणत्याही प्रकरणात धनादेश, धनाकर्ष अथवा रोखीने निधीचे वितरण करण्यात येवू नयेत, असे आदेशही राज्य शासनाचे आहेत.
जिल्हा रेशीम अधिकारी एस.पी.फडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रेशीम बळकटीकरणासाठी मंजूर केलेल्या निधीमुळे रेशीम शेतीला प्रोत्साहन मिळून शेतकरी या उद्योगाकडे वळतील, अशी आशावाद व्यक्त केला.
*खर्चाची तरतूद संचालकांच्या अधिनस्त
केंद्र आणि राज्य शासन तरतूद खर्च करण्यासाठी संचालक (रेशीम) यांच्या अधिनस्त ठेवण्यात आली असून सदर तरतूद बीडीएस प्रणालीवर वितरीत करण्यात आली आहे. हा निधी बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या सुधारीत मानकांच्या दिलेल्या प्रशासकीय मंजुरीनुसार व त्या संदर्भातील मार्गदर्शक सुचनांनुसार खर्च करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.
.