११ कॉपीबहाद्दर निलंबित
By Admin | Updated: March 5, 2017 01:50 IST2017-03-05T01:50:59+5:302017-03-05T01:50:59+5:30
११ विद्यार्थ्यांंना कॉपी करताना निलंबित करण्यात आले.

११ कॉपीबहाद्दर निलंबित
अकोला, दि. ४- बारावी परीक्षेदरम्यान शनिवारी विविध परीक्षा केंद्रांवर ११ विद्यार्थ्यांंना कॉपी करताना निलंबित करण्यात आले. फिजिक्स विषयाच्या पेपरदरम्यान ढोणे कला, विज्ञान महाविद्यालय परीक्षा केंद्रावर पाच कॉपीबहाद्दरांना निलंबित करण्यात आले, तसेच राज्यशास्त्र विषयाच्या पेपरदरम्यान शिवाजी ज्युनियर महाविद्यालय, अकोट परीक्षा केंद्रावर चार कॉपीबहाद्दरांना निलंबित करण्यात आले आणि एसपी पेपरदरम्यान भारतीय ज्ञानपीठ मूर्तिजापूर येथे एका कॉपीबहाद्दराला शिक्षण विभागाच्या भरारीपथकाने निलंबित केले.