शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

जनता दरबारात १0८ तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 1:30 AM

जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात  सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या ‘जनता दरबार’ मध्ये  विविध विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या असून,  जिल्हय़ातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या अडचणी  आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना  दिले.

ठळक मुद्देतक्रारींचे तातडीने निराकरण करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात  सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या ‘जनता दरबार’ मध्ये  विविध विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या असून,  जिल्हय़ातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या अडचणी  आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना  दिले.‘जनता दरबार’ मध्ये जिल्हय़ातील नागरिकांनी केलेल्या तक्रारी,  मांडलेल्या अडचणी आणि समस्या पालकमंत्र्यांनी ऐकून घेतल्या.  नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत, नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे  तातडीने निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या  या जनता दरबारात जिल्हय़ातील नागरिकांकडून विविध  विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये प्रामुख्याने  जिल्हा परिषद, पोलीस विभाग, कृषी विभाग, महानगरपालिका,  नगरपालिका, महसूल विभाग,  कृषी विभाग व विद्युत विभागाशी  संबंधित तक्रारी, अडचणी आणि समस्या नागरिकांनी  पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. विविध समस्या व अडचणींची  निवेदने पालकमंत्र्यांनी यावेळी स्वीकारली. नागरिकांनी केलेल्या  तक्रारीसंबंधी संबंधित विभागप्रमुखांना विचारणा करीत  नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना  पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अपर पोलीस अधीक्षक  विजयकांत सागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.  रामामूर्ती, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उ पजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह संबंधित विभागाचे  अधिकारी उपस्थित होते.

अवैध सावकारी प्रकरणांत तातडीने कारवाई करा!पालकमंत्र्यांचे पोलीस विभागाला निर्देशअवैध सावकारीसंदर्भात ‘जनता दरबार’मध्ये  सावकारग्रस्त  नागरिकांनी केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, अवैध  सावकारीच्या प्रकरणांत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश  पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सोमवारी पोलीस विभागाला  दिले.अवैध सावकारी प्रकरणांत जिल्ह्यातील सावकारग्रस्त शे तकर्‍यांसह नागरिकांनी सन २0१२ मध्ये पोलिसांत दाखल  केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित सावकारांविरुद्ध अद्याप  कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याची तक्रार,  जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित  पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात, सावकारग्रस्तांनी मांडली. या  तक्रारीची गांभीर्याने दखल घेत, पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त  केली. तसेच अवैध सावकारी प्रकरणांत संबंधित सावकारांविरुद्ध  तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. रणजित  पाटील यांनी पोलीस विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांना दिले.

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुख