फुकट्या प्रवाशांकडून १0.२७ लाख रुपये दंड वसूल!

By Admin | Updated: August 2, 2016 00:24 IST2016-08-02T00:24:39+5:302016-08-02T00:24:39+5:30

मध्य रेल्वे भुसावळ मंडळाने राबविले विशेष अभियान.

10.27 lakh rupees fine from freight passengers! | फुकट्या प्रवाशांकडून १0.२७ लाख रुपये दंड वसूल!

फुकट्या प्रवाशांकडून १0.२७ लाख रुपये दंड वसूल!

राम देशपांडे
अकोला: मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाने २२ ते ३१ जुलै विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान २ हजार ५९८ फुकटे प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून रेल्वेने तब्बल १0 लाख २७ हजार ६६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
विभागातील अमरावती, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक, धुळे, खंडवा, बर्‍हाणपूर आदी प्रमुख रेल्वे स्थानकांवर मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाकडून २२ ते ३१ जुलै दरम्यान विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. दहा दिवस राबविण्यात आलेल्या या अभियानात मंडळ अधिकार्‍यांसह विभागातील ३२९ रेल्वे कर्मचारी व २१0 आरपीएफचे पोलीस सहभागी झाले होते. या दहा दिवसात अप आणि डाऊन मार्गावर धावलेल्या ११२ प्रवासी गाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. तिकीट खरेदी न करता प्रवास करताना आढळलेल्या २ हजार ५५0 फुकट्या प्रवाशांकडून १0 लाख १३ हजार ६२६ रुपये दंड वसूल करण्यात आला. तर बुकिंग न करता क्षमतेपेक्षा अधिक सामान घेऊन जाणार्‍या ४८ प्रवाशांकडून १३ हजार ४४0 रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती विभागीय जनसंपर्क अधिकारी पी.एस.पाटील यांनी ह्यलोकमतह्णला दिली. फुकट्या प्रवाशांवर आळा घालण्यासाठी विभागात वेळोवेळी असे अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: 10.27 lakh rupees fine from freight passengers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.