शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

वृक्ष लागवडीसाठी १० हजार सीड बॉम्ब तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 10:32 IST

जिल्हा परिषद आगरकर विद्यालयात १० हजार सीड बॉम्ब तयार करण्याला जागतिक पर्यावरणदिनी सुरुवात करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात वन जंगलाचे प्रमाण वाढविण्यासाठी डोंगराळ भागात बियाणे फेकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून शहरातील जिल्हा परिषद आगरकर विद्यालयात १० हजार सीड बॉम्ब तयार करण्याला जागतिक पर्यावरणदिनी सुरुवात करण्यात आली. त्यासाठी शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह शहरातील पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे.जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण पाहता ते नगण्य आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पाहता ५,६७३ चौ. किमी आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक जिल्हा, राज्य, देशात किमान ३३ टक्के जंगल असणे अनिवार्य आहे. या जिल्ह्यात केवळ ३४०.३७ चौ. किमी. क्षेत्रावर जंगल आहे. त्यातही घनदाट जंगल केवळ ११ चौ. किमी क्षेत्रातच आहे. मध्यम स्वरूपाचे १०८ चौ. किमी तर खुले जंगल २२० चौ. किमी क्षेत्रात आहे. वाढती लोकसंख्या, हवा, पाणी, ध्वनीचे वाढलेले प्रदूषण पाहता हे प्रमाण अत्यल्प आहे.पर्यावरणातील विविध समस्या जंगलाचे प्रमाण घटल्यामुळे निर्माण होत आहेत. त्यावर उपाय म्हणून शासनाकडून वृक्षलागवडीचा कार्यक्रम सुरू आहे. त्यातून फारसे काही हातात पडत नसल्याचेच चित्र आहे. त्यामुळे वृक्षलागवडीऐवजी जंगलातच झाडांचे प्रमाण वाढवून जंगलक्षेत्र व वनाच्छादन वाढवण्याची संकल्पना गेल्या काही वर्षांपासून अ‍ॅड. आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली.पावसाळ्यात जंगलात बियाणे फेकण्यासाठी (सीड बॉम्बिंग) नियोजनही झाले. चालू वर्षात नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांनी उपक्रम राबवण्याची तयारी केली. त्यासाठी शिक्षण विभागानेही पुढाकार घेत विविध साहित्यासाठी जुळवाजुळव केली आहे.माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनीही त्यासाठी सहकार्य केले आहे.

शहरातील पर्यावरणप्रेमींसह नाथनचाही सहभाग!जिल्हा परिषदेचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सभापती पांडे गुरुजी यांच्यासोबत शिक्षणाधिकारी मुकुंद, डॉ. ठग, वृक्षप्रेमी नाथन, माजी नगरसेवक अजय गावंडे, नगरसेविका धनश्री देव, नीलेश देव, पूजा काळे, सतीश उंबरकर, शुक्ला, अंकुश ठोकळ, सौरभ बाछुका, नरेंद्र चिमणकर, भास्कर चित्रे यांनी सहभाग घेत जिल्हा परिषद आगरकर विद्यालयात १० हजार सीड बॉम्ब तयार केले आहेत.

प्रत्येकाने किमान २२ वृक्ष जगवावे...माणसाला त्याच्या हयातीत जगण्यासाठी लागणारा आॅक्सिजनचा पुरवठा किमान २२ वृक्षांकडून होतो. त्यामुळे प्रत्येकाने किमान तेवढे वृक्ष लावून जगवणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी जिल्हा परिषद कर्मचाºयांनी सीड बॉम्ब तयार करण्यात योगदान द्यावे, तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सभापती पांडे गुरुजी यांनी केले.

 

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरण