खात्यातून १0 हजार काढून फसवणूक
By Admin | Updated: February 19, 2015 00:18 IST2015-02-19T00:18:25+5:302015-02-19T00:18:25+5:30
खामगावातील घटना; बँकेचा अधिकारी सांगून मिळविला एटीएम पीन.

खात्यातून १0 हजार काढून फसवणूक
खामगाव (जि. बुलडाणा): बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत एटीएमचा पिन नंबर मिळवून १0 हजार रुपये खात्यातून काढून फसवणूक केली. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
येथील बाळुआप्पा शिवलिंगआप्पा तोडकर (वय ४६) यांच्या मोबाईलवर १७ फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमाने 0९१९९६९0७३0 व 0९0९३९२४७४0 या मोबाईल क्रमांकावरुन कॉल करीत स्वत:ला पंजाब नॅशनल बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत बाळुआप्पा तोडकर यांना त्यांच्या एटीएम खात्याचा पीन क्रमांक विचारला. मात्र पीन क्रमांक दिल्यानंतर कोणीतरी बाळुआप्पा तोडकर यांच्या खात्यातून ९ हजार ८४६ रुपये काढून फसवणूक केल्याचे बाळुआप्पा तोडकर यांच्या लक्षात आले. त्यानंतर बाळुआप्पा तोडकर यांनी बँकेत जावून बँकेच्या अधिकार्यांना याबाबत माहिती दिली तसेच एटीएमवरील व्यवहार बंद केले. यानंतर शहर पोलिस स्टेशनला उ परोक्त आशयाची फिर्याद दिली. याप्रकरणी शहर पोलिसांनी उपरोक्त दोन्ही क्रमांकाच्या मोबाईलधारकाविरुध्द कलम ४२0 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे बँकांकडून याबाबत फोनवर माहिती विचारली जात नाही. असे आवाहन वेळोवेळी करण्यात ये ते. त्यामुळे अज्ञात भामट्यांच्या या चतुराईला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.