बीपीएल कार्डधारकांना १00 रुपयांचे अनुदान
By Admin | Updated: February 23, 2015 01:45 IST2015-02-23T01:45:24+5:302015-02-23T01:45:24+5:30
विदर्भातील १९ लाख शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ.

बीपीएल कार्डधारकांना १00 रुपयांचे अनुदान
बुलडाणा : दारिद्ररेषेखालील नागरिकांच्या शिधापत्रिकेवर जेवढय़ाची नावे आहेत, त्या सर्वांच्या बँक खात्यात पहिल्यांदाच १00 रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. १३ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार हा पैसा ३१ मार्चपयर्ंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्याचा विदर्भातील १९ लाख ३४ हजार शिधा पत्रिकाधारकांना लाभ मिळाणार आहे.
विदर्भात १0 लाख २५ हजार बीपीएल आणि ९ लाख ९४ हजार अंत्योदय लाभार्थी आहेत. बीपीएल कार्डधारकांना प्रतीव्यक्ती २ रुपये किलो दराने ३ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने २ किलो तांदूळ प्राप्त होतात. धान्यासोबत प्रती व्यक्ती १00 रुपये अनुदान मिळणार आहे. मात्र, ही रक्कम एकदाच जमा करण्यात येणार आहे. या पक्रियेसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकेचे संगणकीकरण करण्यात येत असून शिधापत्रिकेचे विवरणपत्र तयार करण्याचे काम सुरू आहे.
शासनाने या योजनेच्या प्राथमिक आराखड्यास ११ डिसेंबर २0१४ मध्ये पहिला आदेश काढला होता. यावेळी योजनेची प्रकिया पुर्ण करण्याची कालर्मयादा ३१ डिसेंबर २0१५ पर्यत ठेवण्यात आली होती. मात्र कालर्मयाद जास्त असल्यामुळे कामामध्ये योग्य गती राखण्यात आली नाही. कामाला गती मिळण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी ३ फेब्रुवारी २0१५ रोजी पुरवठा विभागाला योजनेची अंमलबजावणी प्रभावी करण्याचे निर्देश दिले. यावेळी ३१ मार्च २0१५ ही कालर्मयादा निश्चित करण्यात आली आहे. शिवाय प्रत्येक संगणकीकृत शिधापत्रिकेचा डाटा प्री-प्रिंटड फार्म सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे योजनेच्या कामाला गती मिळाली आहे.