राज्यात बटाट्याचे १०० कोटींचे नुकसान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 10:27 IST2020-04-06T10:26:56+5:302020-04-06T10:27:10+5:30
एकट्या तळेगाव, पुणे भागात यामुुळे शेतकऱ्यांचे २५ कोटींवर तर राज्यात १०० कोटी रुपयांवर नुकसान झाले असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

राज्यात बटाट्याचे १०० कोटींचे नुकसान!
- राजरत्न सिरसाट
अकोेला: ऊर्जा शक्ती निर्माण करणारे कर्बोदके (कार्बोहाइड्रेट) असलेल्या बटाट्याला ‘कोरोना’मुळे अवकळा आली आहे. वेफर, चिप्स बनविणारे कारखाने ‘लॉक डाऊन’मुळे बंद असल्याने बाजारातील मागणी घटली आहे. परिणामी, बाजारात बटाटा प्रति किलो ५ ते ७ रुपये कमी दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे .एकट्या तळेगाव, पुणे भागात यामुुळे शेतकऱ्यांचे २५ कोटींवर तर राज्यात १०० कोटी रुपयांवर नुकसान झाले असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
राज्यात अलीकडे बटाट्याचे क्षेत्र वाढले असूून, मंचर, पुसेगाव आणि विदर्भात बटाटा पिकाचे हब तयार झाले आहे. पुणे, वाशी, पुसेगाव, मंचर येथे बटाट्याची बाजारपेठ आहे; परंतु कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने २३ मार्चच्या मध्यरात्रीपासूनन देशात ‘लॉकडाऊन’ घोषित केले आहे. यामुळे सर्वच प्रकारची वाहतूक बंद आहे. परिणामी, कमी क्षेत्र असलेल्या शेतकºयांना शेतमाल बाजारात घेऊन जाणे कठीण झाले आहे. अनेक शेतकºयांनी घेतलेले कर्ज व इतर घरगुती खर्चासाठी पैशाची नितांत गरज आहे. तेच तुरळक शेतकरी बटाटा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत; परंतु बटाट्याचे दर घटले असून, ५० किलो बटाट्याच्या गोणीमागे शेतकºयांना ४०० रुपये कमी दर दिले जात आहेत. राज्यात शेतकºयांनी प्रक्र्रिया उद्योग सुरू केले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील मनोज बुरड यांंचा एमआयडीसीमध्ये चिप्स, वेफर्स बनविण्याचा उद्योग आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सध्या उत्पादन बंद असून, त्यांच्याकडे तयार असलेल्या पाकीटबंद मालाची मुदत संपत असल्याने हे नुकसानदेखील त्यांना सहन करावा लागत आहे. आजमितीस त्यांच्याकडे ७० हजारांवर वेफर्स, चिप्स बनून तयार होते. त्यांच्याकडे शेती असून, बटाटा लागवड केली आहे; परंतु काढलेला बटाटा २५ दिवसांच्यावर उष्ण हवामानात टिकत नसल्याने बटाटा सडणार आहे.
देशात २० टक्क्यांवर बटाट्याचे नुकसान देशात बटाट्याचे २१ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रात ३० ते ३५ हजार हेक्टरपर्यंत हे क्षेत्र वाढले आहे. आजमितीस देशात बटाट्याचे उत्पादन ५ कोटी १३ लाख १० हजार मेट्रिक टन होत आहे. महाराष्ट्रात बटाट्याचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्याची संधी आहे; परंतुु कोरोनाचा परिणाम देशात २० टक्क्यांहून अधिक तर राज्यात ४४० टक्क्यांपर्यंत बटाट्याचे नुकसान झाले असल्याचा अंदाज तज्ज्ञांंनी वर्तविला आहे.
बटाट्याचे दर एका ५० किलोच्या गोणीमागे ४०० ते ५०० रुपयांनी घटले आहेत. कर्ज परतफेड, घर खर्चासाठी नितांंत गरज असलेले शेतकरीच बटाटा बाजारात विक्र्रीसाठी घेऊन येत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे शीतगृह नसल्याने बटाटा सडत आहे. एकट्या तळेगाव, पुणे भागात २५ कोटींवर नुकसान झाले आहे.
- राजेंद्र्र बारवे, घाऊक विक्रेता कांदा, बटाटा वाशी मार्केट (नवी मुंबई)