खंडेलवाल इंग्लिश स्कूलचे १0 योगपटू राज्य स्तरावर

By Admin | Updated: September 11, 2014 22:56 IST2014-09-11T22:56:14+5:302014-09-11T22:56:14+5:30

अकोला येथे जिल्हास्तर योगासन स्पर्धा.

10 Yoga Teacher of Khandelwal English School at the state level | खंडेलवाल इंग्लिश स्कूलचे १0 योगपटू राज्य स्तरावर

खंडेलवाल इंग्लिश स्कूलचे १0 योगपटू राज्य स्तरावर

अकोला : अकोला जिल्हा योग परिषदेच्यावतीने मराठा मंगल कार्यालय येथे जिल्हास्तर योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत खंडेलवाल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुंदर खेळ प्रदर्शन करीत विजय मिळविला. अमरावती येथे होणार्‍या राज्य स्तरीय योगासन स्पर्धेसाठी शाळेच्या १0 योगपटूंची निवड झाली आहे.
८ ते ११ वर्ष वयोगटात श्‍वेता नळकांडे प्रथम, साक्षी निळे द्वितीय, मुलांच्या गटात कृष्णा आकोटकार प्रथम, ऋषिकेश दंडगव्हाळ द्वितीय, देवेश वीसपुते याने तृतीयस्थान पटकाविले. ११ ते १४ वर्ष वयोगटात ओम नेमाडे याने प्रथम, अभिषेक जांगीड याने तृतीयस्थान मिळविले. वैष्णवी शेळके हिने द्वितीय, हर्षदा राखोंडे व वैष्णवी बाहेकर यांनी तृतीयस्थान पटकाविले.

Web Title: 10 Yoga Teacher of Khandelwal English School at the state level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.