जिल्ह्यात १0 हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करणार!

By Admin | Updated: April 30, 2017 14:20 IST2017-04-30T14:20:30+5:302017-04-30T14:20:30+5:30

जिल्ह्यातील शेततळ्यांच्या कामांचे उद्दिष्ट महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश नवे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले.

10 thousand progressive farmers will be created in the district! | जिल्ह्यात १0 हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करणार!

जिल्ह्यात १0 हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करणार!

जिल्हाधिकार्‍यांचा संकल्प : ह्यमागेल त्याला शेततळ्ेह्ण उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश
अकोला : जिल्ह्यात १0 हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करायचे आहेत, असा संकल्प करीत ह्यमागेल त्याला शेततळेह्ण योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेततळ्यांच्या कामांचे उद्दिष्ट महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश नवे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले.
अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर २६ एप्रिल रोजी विभागप्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय बोलत होते. जिल्ह्यात यावर्षी १0 हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करायचे असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. ह्यमागेल त्याला शेततळे ह्ण योजनेंतर्गत सन २0१६-१७ या वर्षातील जिल्ह्यातील शेततळ्यांच्या कामांचे उद्दिष्ट एक महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी पांडेय यांनी कृषी विभागासह संबंधित यंत्रणांच्या अधिकार्‍यांना दिल्या. जिल्हय़ातील विविध योजना आणि विकास कामांचा आढावा संबंधित अधिकार्‍यांकडून जिल्हाधिकार्‍यांनी घेतला.

जलयुक्त शिवारची अपूर्ण कामे महिनाभरात पूर्ण करा!

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेत, अपूर्ण कामे महिनाभराच्या कालावधीत (जून अखेरपर्यंत) पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले.

तीन लाख शेतकर्‍यांना पीक विम्याचे कवच देणार!

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत येत्या दोन -तीन महिन्यात जिल्ह्यातील तीन लाख शेतकर्‍यांना विमा योजनेंतर्गत समाविष्ट करून, शेतकर्‍यांना पीक विमा योजनेचे कवच देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

Web Title: 10 thousand progressive farmers will be created in the district!