१0 लाखांच्या फसवणूकप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल नाही
By Admin | Updated: July 15, 2014 01:00 IST2014-07-15T01:00:27+5:302014-07-15T01:00:27+5:30
१0 लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार जुने शहर पोलिसांना देऊनही पोलिसांनी अद्यापपर्यंंंत कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची तक्रार दीपक गावंडे यांनी केली.

१0 लाखांच्या फसवणूकप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल नाही
अकोला : रिधोराजवळील शेतामध्ये गजानननगरी नावाने प्लॉट विकण्यासाठी विविध आमिष दाखवून गजानन इन्फ्राव्हेंचर प्रा. लि. चा सतीश विलासराव नरहरशेट्टीवार व अन्य तिघांनी १0 लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार जुने शहर पोलिसांना देऊनही पोलिसांनी अद्यापपर्यंंंत कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची तक्रार दीपक गावंडे यांनी केली. दीपक गावंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गजानन इन्फ्राव्हेंचर प्रा.लि.चा संचालक व बिल्डर सतीश नरहरशेट्टीवार, साईट सुपरवायझर दुष्यंत सोळंके व त्यांचे सहकारी चंद्रकांत खडसे, प्रफुल्ल मून यांनी रिधोराजवळ शेत गट नं. २३, प्लॉट नं. ४३ पार्ट १ मध्ये गजानननगरी या नावाने प्लॉट विकण्यासाठी लोकांना ४ लाखांचा विमा, शुभारंभाच्या दिवशी प्लॉट विकत घेतला तर मोटारसायकल उपहार देण्यात येईलरू असे आमिषं दाखवली. सतीश नरहरशेट्टीवार याने आपल्याला शेताचा मालक असून, या शेतीवर १५ महिन्यांमध्ये गजानन नगरी उभी राहील, असे सांगितले. त्यावर २२१९.२५ चौ. फुटाचा प्लॉट खरेदीचा व्यवहार केला. ईसारापोटी ३ लाख रुपये दिले. उर्वरित ८ लाख ६५ हजार रुपये योजना सुरू झाल्याच्या तारखेपासून १५ महिन्यांच्या मुदतीपर्यंंंत भरण्यास सांगितले. त्यानुसार आप, १६ एप्रिल १३ ते १८ एप्रिल १४ पर्यंंंत दर महिन्याला ५८ हजार रुपये भरले. त्याच्या पावत्यासुद्धा देण्यात आल्या. परंतु नरहरशेट्टीवार व त्याच्या सहकार्यांनी शेतावर कोणतीही गजानननगरी उभारली नाही. नरहरशेट्टीवार याच्या नावावर कोणतेही शेत नाही. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने आपल्यासोबत अनेक लोकांची कोट्यावधी लोकांची फसवणूक केली. त्यामुळे त्याच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी दीपक गावंडे यांनी केली आहे. परंतु जुने शहर पोलिसांनी अद्यापपर्यंंंतही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही.