विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 04:18 PM2020-08-02T16:18:23+5:302020-08-02T16:19:13+5:30

विजेच्या धक्क्याने २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (१ आॅगस्ट) दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील समनापूर शिवारात घडली.

Youth dies of electric shock | विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

googlenewsNext

संगमनेर : विजेच्या धक्क्याने २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (१ आॅगस्ट) दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील समनापूर शिवारात घडली.
 
 देवदत्त घोडेकर (रा.पंपिंग स्टेशन, संगमनेर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. समनापूर येथे घोडेकर यांची शेती असून तेथे कूपनलिका आहे. त्यातील पाणी उपसण्यासाठी विद्युत मोटार बसविली आहे. देवदत्त हा तेथे गेला असता त्याला विजेचा धक्का बसून तो खाली पडला. हे काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्याला उपचारार्थ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले होते. मात्र, त्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

मोठा मित्रपरिवार असलेला देवदत्त घोडेकर हा होतकरू युवक होता. शहरातील अमरधाममध्ये त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक निलेश धादवड तपास करीत आहेत.

Web Title: Youth dies of electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.