शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मागणीअभावी ११ लाख मेट्रिक टन साखर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 5:31 PM

बाजारातील साखरेची मागणी घटल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे़

अण्णा नवथरअहमदनगर : बाजारातील साखरेची मागणी घटल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे़ साखरेला उठाव नसल्याने जिल्ह्यातील २८ सहकारी साखर कारखान्यांच्या गोदामात ११ लाख २३ हजार मेट्रिक टन साखर पडून आहे़ त्यामुळे जिल्हा बँकेकडून घेतलेली उचल परत करणे कारखान्यांना कठीण झाले आहे़मागीलवर्षीच्या गाळप हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १६ लाख ३३ हजार ५५४ मेट्रिक टन साखर उत्पादन झाले़ गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांकडे ४ लाख ३० हजार मेट्रिक टन साखर शिल्लक होती़ दोन्ही हंगामाची एकूण २० लाख ६४ हजार मेट्रिक टन साखर कारखान्यांकडे विक्रीसाठी होती़ केंद्र शासनाच्या नियमानुसार साखर कारखान्यांकडून साखर विक्रीसाठी रीतसर निविदा मागविण्यात आल्या़ मात्र बाजारात साखरेला मागणी नव्हती़ आॅक्टोबर २०१८ ते ३० जून २०१९, या नऊ महिन्यांत केवळ ९ लाख ४० हजार ७८७ मेट्रिक टन साखर विकली गेली़उर्वरित ११ लाख २३ हजार ४९२ मेट्रिक टन साखर गोदांमामध्ये पडून आहे़ साखरेचे अतिरिक्त उत्पादन आणि घटलेली मागणी, यामुळे गेल्या हंगामातील साखर साठवून ठेवण्याची वेळ साखर कारखान्यांवर ओढावली आहे़साखरेवर प्रति क्विंटलवर जिल्हा बँकेकडून कारखान्यांना ८५ टक्के उचल कर्ज रुपाने मिळते़ जिल्ह्यातील कारखान्यांनी जिल्हा बँकेकडून उचल घेतली़ मात्र गेल्या नऊ महिन्यांमध्ये साखरेला उठाव नाही़ त्यामुळे जिल्हा बँकेकडून घेतले कर्ज परत करणे कारखान्यांना शक्य झाले नाही़ बँकेचे कर्ज कारखान्यांच्या डोईजड झाले आहे़सभासदांना एफारपीप्रमाणे दर कारखान्यांनी दिला़ कारखान्यांनी कर्ज घेऊन शेतकऱ्यांचे पैसे दिले़ मात्र आता मागणी नसल्यामुळे साखर पडून आहे़ अतिरिक्त साठविण्यावर कारखान्यांचा खर्च होत असून, अतिरिक्त साखर कारखान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे़साखरेला बाजारात उठाव नाही़ त्यामुळे आधीच अडचणीत असलेले जिल्ह्यातील साखर कारखान्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे़ त्यामुळे कारखान्यांना घेतलेले कर्ज परत करणे शक्य नाही़ त्यावरील व्याजाची रक्कम वाढत आहे़ -सीताराम गायकर, अध्यक्ष, जिल्हा सहकारी बँक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर