किल्ल्यात तलवारीऐवजी छमछम आणणार का?-शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 02:30 PM2019-09-21T14:30:18+5:302019-09-21T14:31:11+5:30

भाजपचे सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला निघाले आहे. त्यामुळे किल्ल्यात आता तलवारीऐवजी बार आणि छमछम आणणार का? अशी टीका राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली. 

Will you bring a sword to the fort instead of a sword? - Sharad Pawar | किल्ल्यात तलवारीऐवजी छमछम आणणार का?-शरद पवार

किल्ल्यात तलवारीऐवजी छमछम आणणार का?-शरद पवार

Next

अहमदनगर : भाजपचे सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला निघाले आहे. त्यामुळे किल्ल्यात आता तलवारीऐवजी बार आणि छमछम आणणार का? अशी टीका राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली. 
   राष्टवादी काँग्रेसचा नगर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. 
यावेळी पवार पुढे म्हणाले, भाजप कारखानदारांचे कर्ज माफ करेल. पण शेतक-यांचे कर्जमाफ करणार नाही, असे अमित शहा म्हणतात. शेतक-यांनी यांचे काय घोडे मारेले? असा सवाल राष्टवादीचे नेते शरद पवार यांनी केला. त्यांनी आॅनलाईन माफी सांगून शेतक-यांची फसवणूक केली, आम्ही सरसकट कर्जमाफी करु. यासाठी तुम्ही भाजपला चले जाव म्हणा, असे आवाहन त्यांनी केले. 
आज अनेक खासगी कारखाने बंद पडत आहेत. यामुळे अनेकांच्या नोक-या जात आहेत. यंदा ऊसच नसल्याने नगर जिल्ह्यातील साखर कारखाने दोन महिन्यापेक्षा अधिक काळ चालणार नाहीत. जिल्हा आर्थिक संकटात आहे. शेतक-यांचे रोज वाटोळे सुरू आहे. त्यांच्याकडे पहायला वेळ नाही आणि महाजनादेश यात्रा मात्र करीत आहेत. पंतप्रधान मोदी झोपेतही पवार..पवार करताहेत. ३७१ नुसार नागालँड, मणिपूर व इतर आठ राज्यात देशातील इतर राज्यातील माणसे जमीन घेऊ शकत नाही. तेथे बदल का नाही? एका धर्माचे लोक राहतात म्हणून काश्मिरला ३७० कलम रद्द केले? असा सवालही पवार यांनी यावेळी केला. 

Web Title: Will you bring a sword to the fort instead of a sword? - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.