विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्व जागा जिंकू : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:55 PM2019-06-02T12:55:36+5:302019-06-02T13:04:07+5:30

येत्या विधानसभेत भाजप-शिवसेना युतीचे जिल्ह्यात सर्वच्या सर्व बारा आमदार निवडून आणणार आहे,

 Will win all the seats in Vidhan Sabha district: Sujay Vikhe | विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्व जागा जिंकू : सुजय विखे

विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्व जागा जिंकू : सुजय विखे

googlenewsNext

कर्जत : येत्या विधानसभेत भाजप-शिवसेना युतीचे जिल्ह्यात सर्वच्या सर्व बारा आमदार निवडून आणणार आहे, असे सांगत खासदार डॉ़ सुजय विखे यांनी जिल्ह्यात काँगे्रस, राष्ट्रवादीमुक्तीचा नारा दिला़ तसेच लोकसभा निवडणुकीत आपल्यासोबत दगाबाजी करणारांची यादीही आपल्याकडे असल्याचे सांगत विधानसभेनंतर त्यांचे काय करायचे ते पाहू, असा इशाराही दिला. कर्जत येथील बाजारतळावर नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे आणि सभापती साधना कदम यांचा सत्कार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात
आला़
यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जेष्ठ नेते आंबादास पिसाळ, बाळासाहेब पाटील, शांतिलाल कोपनर, अल्लाउद्दीन काझी, बापूराव गायकवाड, अंकुशराव यादव, कांतिलाल घोडके, प्रसाद ढोकरीकर, रविंद्र कोठारी, धनराज कोपनर, राजेंद्र देशमुख, बापूसाहेब नेटके, बाबासाहेब गांगर्डे, दादासाहेब सोनमाळी, सुनील साळवे, विजयकुमार तोरडमल, दिग्विजय देशमुख, काकासाहेब धांडे, संजय भैलुमे, रामदास हजारे, अमृत काळदाते, अनिल गदादे, तारक सय्यद, लाला शेळके, वैभव शहा, सतीष समुद्र, विक्रम राजेभोसले, नगरसेविका मनिषा सोनमाळी, मंगल तोरडमल, हर्षदा काळदाते, निता कचरे, वृषाली पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, जे काही मताधिक्य विखेंना मिळाले याचे श्रेय निवडणुकीचा प्रचार प्रमुख म्हणून मला आहे. आमची घट्ट युती झाली होती. मतदारसंघात विकास केंद्रबिंदू माणून काम केले. खासदार विखे आणि आपण मैत्रीतून काम करणारआहे. एका गावाला चार कोटीचा रस्ता देऊनही निवडणुकीत त्यांनी काम दाखविले. मग तुम्ही सांगा काम करूनही असे होत असेल तर कसे चालेल, असे शिंदे म्हणाले. सूत्रसंचालन अनिल गदादे यांनी केले़ आभार युवक मोर्चाचे विनोद दळवी यांनी मानले.

Web Title:  Will win all the seats in Vidhan Sabha district: Sujay Vikhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.