शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

कुणी कॉट देता का कॉट? : जिल्हा रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:56 AM

कुणी कॉट देता का कॉट? एका रुग्णाला कुणी कॉट देता का?

अहमदनगर : कुणी कॉट देता का कॉट? एका रुग्णाला कुणी कॉट देता का? एक रुग्ण कॉटवाचून, बेडवाचून, डॉक्टरांच्या मायेवाचून, नर्सच्या दयेवाचून उघड्याबोडख्यावर पडतोय़ जिथून कुणी उठवणार नाही अशी एक कॉट धुंडाळतोय़ कुणी कॉट देता का़़़ कॉट?, अशी आर्त साद घालण्याची वेळ जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर आलीय़ कधी कधी तर एका बेडवर दोन-दोन रुग्णांना झोपवण्याची किमयाही जिल्हा रुग्णालयात होत असल्याचे ‘लोकमत’च्या स्टींग आॅपरेशनमध्ये उघड झाले़शुक्रवारी दुपारी अडीच वाजता ‘लोकमत’ची टीम जिल्हा रुग्णालयात पोहोचली़ सोबत एक रुग्ण होता़ या रुग्णावर तातडीने उपचार व्हावेत, अशी विनवणी ही टीम तेथील वॉर्डबॉय, नर्सेस यांना करित होते़ पण कोणीही त्यांना दाद नव्हते़ साधे काय दुखतेय, अशी विचारणाही कोणी केली नाही़ ‘डॉक्टर नाहीत़ तुम्ही चार वाजल्यानंतर या, एव्हढेच सरकारी उत्तर दिले जात होते़ त्यानंतर ‘लोकमत’च्या टीमने जिल्हा रुग्णालयातील वेगवेगळ्या वॉर्डमध्ये पाहणी केली़ काही ठिकाणी रुग्णांना खाली फरशीवर गादी टाकून झोपविण्यात आले होते़ तर काही ठिकाणी एका बेडवर दोन-दोन रुग्णांना झोपविण्यात आले होते़ कुस बदलण्यासाठीही त्यांना मोठे कष्ट घ्यावे लागत होते़ काही रुग्ण अपघातात जखमी झालेले तर काहींना दुर्धर आजाराने ग्रासलेले होते़ पण त्यांना खाली फरशीवर झोपविण्यात आले होते़ या रुग्णांशी ‘लोकमत’ने संवाद साधला़ वारंवार कॉटची मागणी करुनही कॉट उपलब्ध करुन दिली जात नसल्याचे या रुग्णांनी सांगितले़ तर वॉर्डबॉयने कॉट शिल्लक नसल्यामुळे त्यांना खाली झोपविण्यात आल्याचे सांगितले़तर खासगीत जाएका रुग्णाला पायाला लागलेले होते़ फरशीवर त्याला झोपविण्यात आले होते़ हा रुग्ण कॉटसाठी विनवणत होता़ परंतु, त्याला सरळ खासगी रूग्णालयातजाण्याचा सल्ला देण्यात आला़ खासगीत जाण्याइतके पैसे असते तर इकडे नरकयातना भोगायला कशाला आलो असतो, असा सवाल त्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़१०० ते २०० कॉटची गरजजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे सध्या उपलब्ध असणाºया कॉटची संख्या अपुरी पडत आहे़ शासनाकडे १०० ते २०० कॉट नव्याने पुरविण्यात याव्यात, असा प्रस्ताव पाठविला आहे़ पण अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही़ नव्या कॉट उपलब्ध झाल्यानंतर रुग्णांची गैरसोय टळेल, असे डॉ़ मुरंबीकर यांनी सांगितले़स्वतंत्र वुमन्स हॉस्पिटलचा प्रस्तावजिल्हा रुग्णालयात महिला रुग्णांची संख्या प्रचंड आहे़ महिला व पुरुष वॉर्ड वेगवेगळे असले तरी जागा अपुरी पडत आहे़ उपचार करताना मर्यादा येतात़ त्यामुळे सरकारकडे जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच स्वतंत्र वुमन्स हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव पाठविला आहे़ पूर्वी जुन्या हॉस्पिटलच्या जागेवर हा प्रस्ताव दिला होता़ मात्र, जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच वुमन्स हॉस्पिटल व्हावे, अशी आमची मागणी आहे़ त्यावर पाठपुरावा सुरु आहे़ तसे झाल्यास डॉक्टरांच्या उपलब्धतेनुसार सेवा बजावता येईल, असे डॉ़ मुरंबीकर यांनी सांगितले़जिल्हा रुग्णालयात सध्या ३०० कॉट आहेत़ नोव्हेंबर महिन्यात ३ हजार १४९ रुग्ण अ‍ॅडमिट होते़ वाढत्या रुग्ण संख्येमुळे कॉट अपुºया पडत आहेत़ बाह्य रुग्ण विभागात १७ हजार ७२९ रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत़ ५१५ महिलांच्या प्रसूति तर ६१० रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत़ मागील आठवड्यात ८५० दिव्यांगांना आॅनलाईन प्रमाणपत्र वितरीत केले आहेत़- - डॉ़ प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालय