शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

पोशिंदा बाप गेल्याने हावश्या पोपट्याला झाले अश्रू अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:13 AM

वारणेच्या वाघासारखी धिप्पाड शरीरयष्टी, भरदार गर्दन, टोकदार नाक, पिळदार मिशा, छिप्पाड छाती, धिप्पाड ध्येययष्टी

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : वारणेच्या वाघासारखी धिप्पाड शरीरयष्टी, भरदार गर्दन, टोकदार नाक, पिळदार मिशा, छिप्पाड छाती, धिप्पाड ध्येययष्टीला शोभेल असा डोक्यावर फेटा, घोड्यावरून चिखलीच्या डोंगरात भटकंती करणारे चिखलीचे सदाशिव सिताराम बुलाखे (वय९०) यांनी आपल्या आवडत्या हावश्या आणि पोपट्या या बैलाच्या सानिध्यात आपला देह ठेवला. आपला पोशिंदा बाप सोडून गेल्याचे पाहून हावश्या आणि पोपट्याला अश्रू अनावर झाल. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.निसर्गाच्या सानिध्यात राहून काळ्या आईशी इमान राखून, शेळ्या, मेंढ्या, जनावरे यांना कामधेनू मानून, रात्रंदिवस काळ्या आईचे व या कामधेनूंच रक्षण करणारा परिसरातील सात गावातील सर्व लोकांशी प्रामाणिक राहून, विनोदाने हास्यकल्लोळ करणारे दलित समाजातील सदाशिव बुलाखे . त्यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण होती. कसल्याही प्रकारचा डॉक्टर नाही, दवाखाना नाही. सतत निसर्गाच्या सान्निध्यात. मरणाच्या दिवशी घोड्यावर स्वार होऊन तलुलीच्या पठारावर हुलग्याचे राखण करण्यासाठी गेले होते.आपले श्रद्धास्थान म्हसोबाजवळ त्यांचे ‘हावश्या’ आणि ‘पोपट्या’ ही जीवाभावाची बैलजोडी बरोबर होती. सदाशिव बुलाखे यांना तिथच हृदयविकाराचा झटका आला. धिप्पाड शरीरयष्टीचा मालक जमीनीवर कोसळला. हावश्या अन पोपट्याचा जीव कासावीस होऊ लागला. कासावासीमुळे मोठ्याने ओरडू लागले. बुलाखे परिवार उपस्थित होईपर्यत हावश्या पोपट्याच्या डोळ्यातून दु:खाचे अश्रू थांबत नव्हते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा