शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

आमचे सरकार आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची चौकशी करु- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 6:20 PM

देशात हे सरकार आपल्या सर्व व्यवस्था गुंडाळण्याचे काम करीत आहे. इव्हीम मशीन हॅक होतात. ते एका नेत्याला माहीत होते आणि त्यांचा अपघात होतो.

कर्जत : देशात हे सरकार आपल्या सर्व व्यवस्था गुंडाळण्याचे काम करीत आहे. इव्हीम मशीन हॅक होतात. ते एका नेत्याला माहीत होते आणि त्यांचा अपघात होतो. हे हॅकर स्वत: सांगत आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा अपघात की हत्या याची चौकशी झाली पाहिजे. आपले सरकार आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची चौकशी करु, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर केला.कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयासमोर आयोजित परिवर्तन मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, जनतेला फसविणारी टोळी दिल्ली आणि मुंबईत सरकार म्हणून बसली आहे. तिजोरीत पैसा नाही आणि घोषणांचा पाऊस आहे.धनंजय मुंडे म्हणाले, आजची परिस्थिती पाहता मोदींच्या अच्छे दिनाची गल्ली ते दिल्ली चेष्टा झाली आहे. सर्वांच्या खात्यात १५ लाख जमा होतील, असे सांगत होते. पण १५पैसेही जमा झाले नाही. फसविल्यानंतरही काही भक्त आचारसंहितेच्या आधी १५ लाख खात्यावर येतील या आशेवर आहेत. आता निवडणुका लागल्या नसत्या तर पेट्रोलने शतक गाठले असते. शेतक-यांनाही सपशेल फसविले आहे. मुख्यमंत्र्यासह एकही मंत्री शेतक-याचे लेकरु नसल्याने शेतक-यांचे दु:ख, प्रश्न यांना माहित नाहीत. त्यामुळे आता परिवर्तन अटळ आहे.यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवा नेते रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, रामानंद तीर्थ विद्यापिठाचे माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, अविनाश आदिक, किशोर मासाळ, दादाभाऊ कळमकर, प्रा.मधुकर राळेभात, मंजूषा गुंड, माजी सभापती सोनाली बोराटे, राजेंद्र कोठारी, कैलास वाकचौरे, उमेश परहर, राजेंद्र गुंड, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, वसंत कांबळे, अ‍ॅड.सुरेश शिंदे, अ‍ॅड. बाळासाहेब शिंदे, शाम कानगुडे, फिरोज पठाण उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी प्रास्ताविक केले. मधुकर राळेभात, मंजूषा गुंड यांचे भाषण झाले.पिशवित पैसे नेऊन खिशात सामान आणावे लागेल - छगन भुजबळआज देशात परिवर्तनाची गरज आहे. मोदी शेतक-यांच्यासाठी नुसत्या घोषणा करतात परंतू काहीच करीत नाहीत .मन की बात ही एक नौटंकी असून हा फक्त देखावा आहे. हे सरकार परत आले तर पिशवित पैसे नेऊन खिशात सामान आणावे लागेल. पेट्रोलने सध्या मोदींच्या वयाचे पुढे गेले आहे. हे परत आले तर मसाल्याच्या जाहिरातीतील काकांच्या वयाच्या पुढे जाईल, असे बोलून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर तोफ डागली.देशात कृषिमंत्री कोणाला माहित नाही -रोहित पवारशेतक-यांच्या प्रश्नाचे या सरकारला गांभीर्य नाही. मालाला भाव, पाणी, दुष्काळात विमा, कर्जमाफी अशा शेतक-यांच्या समस्या असतात. परंतू हे सरकार शेतक-यांच्या भावना समजू शकत नाही.य् ाांनी कर्जमाफी जाहिर केली परंतू झाली नाही. या देशात कृषिमंत्री कोणाला माहित नाही. देशाचे नेते शरद पवार यांनी सर्वात मोठी कर्ज माफी शेतक-यांना दिली होती, असे प्रतिपादन रोहित पवार यांनी केले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत