गुजरात व हिमाचल प्रदेशाच्या विजयाचे नगरमध्ये जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 03:01 PM2017-12-18T15:01:59+5:302017-12-18T15:25:56+5:30

भारतीय जनता पार्टीने गुजरात व हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांमध्ये बहुमत मिळविल्यानंतर नगरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मी कारंजा चौक व चितळेरोड येथे जल्लोष करुन आनंदोत्सव साजरा केला.

Welcome to the victory of Gujarat and Himachal Pradesh | गुजरात व हिमाचल प्रदेशाच्या विजयाचे नगरमध्ये जल्लोषात स्वागत

गुजरात व हिमाचल प्रदेशाच्या विजयाचे नगरमध्ये जल्लोषात स्वागत

googlenewsNext

अहमदनगर : भारतीय जनता पार्टीने गुजरात व हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांमध्ये बहुमत मिळविल्यानंतर नगरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मी कारंजा चौक व चितळेरोड येथे जल्लोष करुन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नागरिकांना लाडू वाटण्यात आले.
भाजप कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सरचिटणीस गौतम दीक्षित यांनी गुजरात व हिमाचल प्रदेशच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे तसेच गुजरात व हिमाचल प्रदेशाचे भाजपचे सर्व पदाधिकारी यांच्या अभिनंदाचा ठराव मांडला. नगर शहरात नरेंद्र कुलकर्णी, केडगाव येथे शरद ठुबे, भिंगार येथे शिवाजी दहिहंडे तर सावेडीत युवा मोर्चाच्यावतीने जल्लोष करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, उपमहापौर श्रीपाद छिंदम, संघटन सरचिटणीस किशोर बोरा, उपाध्यक्ष किशोर डागवाले, श्रीकांत साठे, एल. जी. गायकवाड, प्रशांत मुथा, चेतन जग्गी, नितीन शेलार,अन्वर खान, धनंजय जामगांवकर, हेमंत दंडवते, नाना भोरे, सागर गोरे, अ‍ॅड. राहुल रासकर, महेश तवले, वसंत राठोड, गणेश साठे, जालिंदर तनपुरे, गोकूळ काळे, लक्ष्मीकांत तिवारी, सुजित खरमाळे, दिलीप गंधे, नितीन जोशी, कैलास गव्हाणे, संतोष शिरसाठ, दिपक उमाप, गणेश शिंदे, पियुष संचेती, गोपाल वर्मा, गणेश कोरडे, गणेश हडवळे, निलेश केदारे, शिवलिंग शिंदे, अदित्य घोलप, अभिषेक गायकवाड, सलिम पिंजारी, सुंदर पांढरे, अमोल निस्ताने, किशोर कटोरे, नरेश चव्हाण, पवन चुटके, रितेश बकरे, सतीश शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Welcome to the victory of Gujarat and Himachal Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.