Weekend lockdown tight in Ahmednagar district | अहमदनगर जिल्ह्यात विकेण्ड लॉकडाऊन कडकडीत 

अहमदनगर जिल्ह्यात विकेण्ड लॉकडाऊन कडकडीत 

अहमदनगर  : राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात विकेण्ड लॉकडाऊन कडकडीत पाळला गेला आहे. सर्व दुकाने, बाजारपेठा बंद असून रस्त्यावरही शुकशुकाट आहे. 

अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाणा-या येणा-यांना सूट दिली जात आहे. सकाळी दुध, किराणा दुकाने उघडली होती, मात्र पोलिसांनी ती बंद केली. भाजीपाला विकणारे आज आले नाहीत.  सकाळी दुध विक्री सुरू होती. अकरानंतर तीही बंद करण्यात आली.

नगरमधील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरेही बंद आहेत. रस्त्यावर मेडीकल वगळता एकही दुकान सुरू नाही.  विकेण्ड 
लॉकडाऊनला दुकानदार, विक्रेते, नागरिक यांचा चांगला प्रतिसाद आहे.

Web Title: Weekend lockdown tight in Ahmednagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.