शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

‘हम सब एक साथ, दुष्काळाशी करू दोन हात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:00 AM

न कळत्या वयात त्यांना हंडाभर पाण्यासाठी मैलोमैल फिरावे लागे. कधी छावणीत आपल्या पशुधनासोबत मुक्काम करावा लागे. दुष्काळाचे चटके बालवयात सोसावे लागणारे चिमुकले हात सुट्टीची मौजमजा सोडून गावाच्या जलसंधारण कामाच्या श्रमदानासाठी झटत आहेत.

ठळक मुद्देपाण्यासाठी चिमुकल्यांचे सुट्टीवर पाणी !तुफान आलयाटँकर मागे पळणारे व छावणीत मुक्काम ठोकणारे चिमुकले हात करताहेत दुष्काळाशी दोन हात

योगेश गुंडकेडगाव : न कळत्या वयात त्यांना हंडाभर पाण्यासाठी मैलोमैल फिरावे लागे. कधी छावणीत आपल्या पशुधनासोबत मुक्काम करावा लागे. दुष्काळाचे चटके बालवयात सोसावे लागणारे चिमुकले हात सुट्टीची मौजमजा सोडून गावाच्या जलसंधारण कामाच्या श्रमदानासाठी झटत आहेत. नगर तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमधून सध्या चिमुकले दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी श्रमदानात आपला खारीचा वाटा उचलत आहेत.दुष्काळी नगर तालुक्याचे चित्र जलयुक्त योजनेमुळे आता काहीशे बदलत आहेत. मात्र सरकारी योजनेवर अवलंबून न राहता लोकसहभाग वाढवून काही गावांनी दुष्काळ मुक्तीच्या दिशेने पाउल टाकले आहे. जलसंधारणच्या कामात अनेक गावांनी भाग घेऊन गाव पाणीदार करण्याचा चंग बांधला आहे. सध्या पाणी फौंडेशनची वॉटर कप स्पर्धा सुरु आहे. नगर तालुक्यातील जवळपास ५२ गावांनी यात सहभाग घेऊन प्रशिक्षण घेतले. मात्र प्रत्यक्षात २५ गावानीच काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या गावांनी काम सुरु केले पण सध्या पाच-ते सहा गावेच यात तग धरून उभे आहेत. गावातील नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, समतल चर, बांध बंधीस्ती, दगडांचे बांध घालणे आदी कामे करून गावातील पाण्याचा थेंब न थेंब गावातच साठवण्यासाठी हि गावे आता अंग झटकून काम करत आहेत. यात मांजरसूंबा, डोंगरगण, सारोळा कासार हि गावे आघाडीवर आहेत.दुष्काळी नगर तालुक्यात शालेय विद्यार्थी आता या जलसंधारण चळवळीत उतरले आहेत. कधीकाळी पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे मैलोमैल पाण्यासाठी हिंडणारे मुले तर कधी आपल्या पशुधनासाठी छावणीत मुक्काम करणारे हे चिमुकले आता भल्या सकाळी आणि संध्याकाळी गावातील श्रमदानासाठी आपला खारीचा वाटा उचलत आहेत. उन्हाळी सुट्टी असल्याने शालेय विध्यार्थी मोठ्या संख्येने गावातील मोठ्यांच्या खांद्याला खांदा लाऊन श्रमदान करण्याचे काम करत आहेत. यातून गावातील समतलचर, दगडी बांध घालणे अशी कामे करून मुलांनी दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी आपल्या सुट्टीवर पाणी सोडले आहे. सुट्टीतील मौजमजा सोडून, मामाच्या गावाची गंमत सोडून हे शाळकरी चिमुकले हात आता गावाला पाणीदार करण्यासाठी श्रमदान करताना दिसत आहेत. मांजरसुंबा व सारोळा कासार आणि डोंगरगण या गावातील मुलांचे हे श्रमदान गावातील मोठ्यांना लाजवणारे आहे. गावाला बक्षीस मिळवून देण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न वाखाण्याजोगे आहेत.श्रमदानाच्या ठिकाणीच पहिला वाढदिवस साजराश्रमदानाच्या सातव्या दिवशी सारोळा कासार येथे अनोखा उपक्रम साजरा झाला. वरद संदीप कडूस याचा पहिला वाढदिवस श्रमदानाच्या ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी हैप्पी बर्थडे ऐवजी हम सब एक साथ, दुष्काळाशी करू दोन हात अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपसरपंच दत्तात्रय कडूस यांनी सर्व टीम ला ११०० रुपयांची देणगी दिली. केकच्या अवती भोवती मेणबत्ती ऐवजी टिकाव, घमेले, फावडे ठेवण्यात आले होते.वॉटर कप स्पर्धेत आमच्या गावाने सहभाग घेतला. आम्ही सर्व मुले आनंदाने श्रमदानासाठी रोज जातो. आम्ही शाळेत १२ हजार रोपे लाऊन रोपवाटिका तयार केली आहे. उन्हात खेळायला जाऊ नको म्हणणारे आमचे आई वडील श्रमदानासाठी आम्हला अडवत नाहीत. - यश हारदे, विद्यार्थी, इयत्ता ६ वी, सारोळा कासार 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा