शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

पाणी योजनेसाठी देवळालीच्या एक्सप्रेस फिडरचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:50 AM

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी महावितरणने २०११-१२ मध्ये मंजूर केलेल्या उच्च दाबाच्या एक्सप्रेस फिडरसाठी २७ लाख ४२ हजार रूपये जिल्हा नियोजन निधीतून उपलब्ध झाल्यामुळे योजनेतील अडथळा दूर झाला आहे.

ठळक मुद्देजिल्हा नियोजनमधून २७ लाख रूपये मंजूर

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी महावितरणने २०११-१२ मध्ये मंजूर केलेल्या उच्च दाबाच्या एक्सप्रेस फिडरसाठी २७ लाख ४२ हजार रूपये जिल्हा नियोजन निधीतून उपलब्ध झाल्यामुळे योजनेतील अडथळा दूर झाला आहे.महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानांतर्गत देवळाली प्रवरा पालिकेस १ कोटी २५ लाख रूपये मिळाले होते. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने २०११-१२ मध्ये प्रशासकीय मंजुरी दिली. याच निधीमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या एक्सप्रेस फिडरसाठी २० लाखांच्या निधीची तरतूद केली होती. २०११ मध्येच मुळा प्रवरा वीज सहकारी संस्था बरखास्त होऊन तिचे कार्यक्षेत्र महावितरणने अधिग्रहण केल्याने एक्स्प्रेस फिडरचे अंदाजपत्रक बदलले. महावितरणने ४७ लाख ४२ हजार रूपयांचे सुधारित अंदाजपत्रक तयार केले. त्यामुळे पूर्वीच्या अंदाजपत्रकात २७ लाख ४२ हजार रूपयांची तफावत पडली होती. त्यामुळे पालिकेच्या तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी याबाबत अनेकदा पत्रव्यवहार करून देखील ही योजना पूर्णत्वास नेता आली नाही. दीड वर्षांपूर्वी नगराध्यक्ष सत्यजित कदम व त्यांच्या सहकाºयांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकारातून ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार बावनकुळे यांनी पालकमंत्री शिंदे यांना नाविन्यपूर्ण योजनेंंतर्गत २७ लाख ४२ हजार रूपये एवढी फरकाची रक्कम जिल्हा नियोजन निधीतून देण्याचे आदेश दिले.त्यानुसार ६ जानेवारीस जिल्हा नियोजन समितीने हा मंजूर करून २० फेब्रुवारीस पालिकेस अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले. पालिकेने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून अंदाजपत्रक तयार करून १२ मार्चला जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी १६ मार्चला नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत पालिकेस २७ लाख ४२ हजार रूपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेसाठी एक्सप्रेस फिडर वापरणारी देवळाली प्रवरा ही अहमदनगर जिल्ह्यातील पहिलीच नगरपालिका असणार आहे. त्यामुळे शहरातील पाणी योजनेच्या पाणी योजनेचा वीज प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी