शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

राजकीय इच्छाशक्तीअभावी पाणीप्रश्न गंभीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 6:29 PM

जामखेड तालुक्यातील जनता मुलभूत गरजांपासून कोसो दूर आहे. पिण्याचे पाणी जनतेला दुर्लभ झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

संतराम सूळजवळा : जामखेड तालुक्यातील जनता मुलभूत गरजांपासून कोसो दूर आहे. पिण्याचे पाणी जनतेला दुर्लभ झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. कमी पर्जन्यमान झाल्यास दुष्काळ ठरलेलाच असतो. केवळ राजकीय इच्छाशक्ती अभावी पाणी प्रश्न गंभीर झाला आहे.सोलापूर जिल्ह्यातील रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरणारा कृष्णा-भीमा जल स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून मिळविले. या प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा खोऱ्यात नव्याने उपलब्ध होणाºया तब्बल ११५ टीएमसी पाण्यापैकी निम्मेअधिक पाणी उजनी धरणात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला याचा लाभ होणार आहे. पाणीप्रश्नी उत्तर नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळीही एकत्र येतात. जामखेड तालुक्यात पाण्यााबाबत कमालीची उदासीनता दिसून येते.नगर दक्षिणेतील जामखेड तालुका हा असा एकमेव आहे की जेथे पाटपाण्याची कुठलीही सोय नाही. कायम दुष्काळी अशीच ओळख आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर येथील शेती अवलंबून आहे. त्यामुळे कमी पर्जन्यमान झाल्यास दुष्काळ ठरलेलाच असतो. त्याचा दुरगामी परिणाम होत आहेत. अनेक कुटुंबांना केवळ रोजगारासाठी बाहेरगावी स्थलांतर करावे लागते. स्थलांतराचे हे प्रमाण जामखेड तालुक्यात तब्बल २८ टक्के एवढे आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतीला पाणी मिळणे हाच यावरचा एकमेव उपाय ठरत आहे.पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी गेल्यावर्षी कुकडी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता घेताना कुकडीच्या लाभक्षेत्रात जामखेड तालुक्यातील सीना नदीवरील आगी व जवळा या दोन बंधाऱ्यांचा समावेश केला. यापूर्वी युती सरकारच्या काळातच ५ डिसेंबर १९९७ रोजी सीनावरील चोंडी बंधाºयाचा समावेश कुकडी लाभक्षेत्रात करण्यास मान्यता मिळाली होती.कुकडीचे ३८ टीएमसी पाणी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्ननर व शिरूर, नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा व कर्जत तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या सात तालुक्यांना दिले जाते. त्यामुळे भविष्यात जामखेडला कुकडीचे पाणी मिळेल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे जामखेड तालुक्यासाठी कृष्णा-भीमा जल स्थिरीकरण प्रकल्प हाच एकमेव पर्याय उरला आहे.दिवंगत डॉ. पी. जी. गदादे यांची ओळख ही पाणीप्रश्नाचे लढवय्ये नेते अशीच होती. जामखेडचा पाणीप्रश्न डॉ. गदादे यांच्याशिवाय दुसºया कोणीही पोटतिडकीने मांडला नाही. त्यांनी पाणीप्रश्नी केलेली आंदोलने जिल्ह्यात गाजली. याप्रश्नी जेलेभरो, मुंबईला उपोषण, रास्ता रोको, आत्महदन, स्वत:ला दफन करून घेणे, वेगवेळ्या प्रकारची कितीतरी आंदोलने त्यांनी केली. त्यांनी कायम शेतकरी केेंद्रस्थानी ठेवला. पाणी प्रश्नी आज त्यांची उणीव भासत आहे.प्रस्तावित कृष्णा-भीमा जल स्थिरीकरण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जामखेड तालुक्याचा समावेश करून हक्काचे पाणी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. कुकडी लाभक्षेत्रात चोंडीबरोबरच आगी आणि जवळा बंधाºयांचा समावेश करून त्यामाध्यमातून कुकडीचे पाणी जामखेड तालुक्याला मिळविले आहे. जामखेड तालुक्यात मोठ्या स्वरूपात जलसंधारणाची कामे झाल्याने पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्याचे काम झाले आहे.-प्रा. राम शिंदे, पालकमंत्री

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर