शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
3
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
4
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
5
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
6
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
7
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
8
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
9
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
10
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
11
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
12
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
13
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
14
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
15
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
16
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
17
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
18
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
19
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
20
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

सीना धरणाची पाणी पातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 5:23 PM

सीना धरणातील पाणी पातळी खालावली असून धरणात मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणावरून पाणी पुरवठा करणाऱ्या योजनाही संकटात आहेत.

विनायक चव्हाणमिरजगाव : सीना धरणातील पाणी पातळी खालावली असून धरणात मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणावरून पाणी पुरवठा करणाऱ्या योजनाही संकटात आहेत.सीना धरण लाभक्षेत्रात यंदा जेमतेमच पाऊस झाला. याच दरम्यान भोसे खिंडीतून कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी सीनात आल्याने पाणीसाठा ७२ टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर पावसाच्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात न झाल्याने पाणी पातळी वाढू शकली नाही. २०१७ मध्ये हे धरण ओव्हफ्लो झाले. त्यानंतर हे धरण ओव्हरफ्लो झाले नाही. आज धरणात मृतसाठा इतकेच पाणी शिल्लक असून सध्या मिरजगाव व मांडवगण या पाणी योजना कार्यान्वीत आहेत. टॅँकरसाठी काढलेले सतरा गाव पाणी योजनेचे उद्भव मात्र बंद असले तरी धरण लाभक्षेत्रातील कर्जत व आष्टी तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई भासू लागली.त्यामुळे येत्या काही दिवसात हे उद्भव टॅँकर भरण्यासाठी सुरू करावे लागतील. धरणात ६७९.८९ दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा असला तरी यामध्ये मृतसाठा ५५२.६७ दशलक्ष घनफूट आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा १२२.०२ दशलक्ष घनफूट असला तरी, धरणात १७५ दशलक्ष घनफूट गाळ आहे.पाणी योजना व धरणावरून शेतीसाठी पाणी उपसा करणाºया शेतीपंपाची संख्याही मोठी असल्याने दररोज तीन दशलक्ष घनफूट पाणी उपसा होत आहे. गेल्यावर्षी याच धरणातून दररोज कर्जत व आष्टी तालुक्यातील ३५५ टॅँकर भरले जात होते.सध्या परिसरातील विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी झपाट्याने कमी होत असल्याने अनेक गावात पाणी टंचाई जाणवणार आहे. यासाठी सीना धरणात भोसेखिंडीतून कुकडीचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी होत आहे.सीना धरणात सध्या मृतसाठाच शिल्लक असून कुकडीच्या सध्याच्या आवर्तनातून सीनाधरणात आवर्तन येणार नाही. -बाजीराव थोरात, उपविभागीय अधिकारी, सीना उपविभाग, मिरजगाव

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय