शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

२३ पथकांद्वारे निवडणूक प्रक्रियेवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 5:05 PM

जिल्हा प्रशासनाने मनपा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली असून, निवडणूक शांततेत व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. पुढील तीन दिवस एकूण २३ पथकांद्वारे आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जाईल

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने मनपा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली असून, निवडणूक शांततेत व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. पुढील तीन दिवस एकूण २३ पथकांद्वारे आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी रात्रं-दिवस शहरात पथकांचा वॉच असणार आहे. मतदारांनीसुद्धा गैरप्रकारांना थारा न देता १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. येत्या रविवारी (दि. ९) रोजी मतदान होत असून यासाठी ३३७ मतदान केंद्र आहेत. १ नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू केली असून आचारसंहिता कक्षाद्वारे नेमलेली पथके योग्य ती कार्यवाही करत आहेत. आतापर्यंत ६ भरारी पथके तैनात होती. परंतु शुक्रवारपासून मतमोजणीपर्यंत अजून १७ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय ६ चेक पोस्ट पथक, ६ व्हिडिओ सर्व्हेलियन्स पथक, १ छायाचित्रण तपासणी पथक कार्यरत आहेत. याशिवाय २ हजार निवडणूक कर्मचारी व २ हजार पोलीस कर्मचारी नियुक्त असून, कोणत्याही स्थितीत कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक संनियंत्रण समिती, रेडिओ, टीव्ही, जाहिरात साहित्य तपासणी समिती, पेड न्यूज समिती, तसेच तहसीलदार यांची समिती कार्यरत आहे. मतदारांना प्रलोभन दाखवण्याचे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथक असून आतापर्यंत आचारसंहिता कक्षाकडे १२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील सर्वांवर कार्यवाही झाली असून २ तक्रारींवर थेट गुन्हे दाखल झाले आहेत.शनिवारी, तसेच मतदानाच्या दिवशी ही पथके आणखी गतिमान होतील. उमेदवारांकडून पैसे वाटण्याचे, तसेच दहशतीचे प्रकार होत असतील तर त्वरित आचारसंहिता कक्षाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचार संपलेला असून सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी लावलेले बॅनर काढावेत, अन्यथा त्यांच्यावर गुन्हेदाखल होतील, असेही द्विवेदी म्हणाले.आज कर्मचारी होणार बूथवर रवानानिवडणुकीसाठी नियुक्त असणा-या २ हजार कर्मचा-यांना शनिवारी दुपारपर्यंत मतदान साहित्याचे वाटप होऊन हे कर्मचारी सायंकाळपर्यत संबंधित मतदान केंद्रावर पोहोचतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर यांनी दिली.मतमोजणी भवानीनगर (आनंदधामजवळ) येथील वखार महामंडळाच्या गोदामात सोमवारी (दि.१०) सकाळी दहा वाजेपासून सुरू होईल. सर्व १७ प्रभागांची मोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. एका प्रभागासाठी स्वतंत्र तीन टेबल असतील. जेथे मतदानकेंद्र कमी असतील, तेथील निकाल आधी लागेल. साधारण बारा वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येऊ शकतो. त्यानंतर पुढील निकाल गतीने लागतील. तांत्रिक अचडणी आल्या नाहीत, तर दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता जिल्हाधिकाºयांनी वर्तवली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर