Vidhan Sabha election result: Balasaheb Tharoor leads 5,000 votes in Sangamner | विधानसभा निवडणूक निकाल : संगमनेरातून बाळासाहेब थोरातांना १२ हजार मतांची आघाडी
विधानसभा निवडणूक निकाल : संगमनेरातून बाळासाहेब थोरातांना १२ हजार मतांची आघाडी

संगमनेर : काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून मोठी आघाडी मिळाली आहे़. सहाव्या फेरीअखेर थोरातांना १२ हजार २३६ मतांची आघाडी मिळाली आहे़.
थोरात यांच्या विरोधात उद्योजक साहेबराव नवले यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती़ नवले यांनी थोरात यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता़. गावोगाव सभा, मेळावे घेत त्यांनी थोरातांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला़. थोरात यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यामुळे ते मतदारसंघात कमी अन् इतर उमेदवारांच्या प्रचारातच जास्त राहिले़. त्यांनी राज्यभरात ६० पेक्षा अधिक सभा घेतल्या होत्या़. त्यामुळे नवले हे कडवी झुंज देतील, असे बोलले जात होते़. मात्र, पहिल्या फेरीपासूनच थोरातांनी घेतलेली आघाडी कायम टिकवली आहे़. सहाव्या फेरीअखेर थोरातांनी १२ हजार २३६ मतांची आघाडी घेतली आहे़ अजून १८ फे-या बाकी आहेत़. 


Web Title: Vidhan Sabha election result: Balasaheb Tharoor leads 5,000 votes in Sangamner
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.