‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके, तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 01:28 PM2021-03-06T13:28:32+5:302021-03-06T13:29:37+5:30

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड झाली. या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यावरच आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.  पारनेरचे उदय शेळके हे राष्ट्रवादीचे, तर संगमनेरचे माधवराव कानवडे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आहेत. 

Uday Shelke as Chairman of District Co-operative Bank, while Madhavrao Kanwade as Vice Chairman unopposed | ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके, तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे बिनविरोध

‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके, तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे बिनविरोध

googlenewsNext

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड झाली. या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यावरच आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.  पारनेरचे उदय शेळके हे राष्ट्रवादीचे, तर संगमनेरचे माधवराव कानवडे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आहेत. 

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी नवीन संचालक मंडळाची शनिवारी दुपारी १ वाजता बँकेच्या मारुतराव घुले पाटील सभागृहात बैठक झाली. त्यामध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली.  बैठकीला सर्व संचालक हजर होते. सुरवातीला अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर अर्जांची छाननी झाली. दोन्ही पदांसाठी दोघांचेच अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.

निवड प्रक्रिया पार पाडण्यापूर्वी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी दुपारीच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारणतंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या बंगल्यावर नव्या संचालकांसमवेत बैठक झाली. तिथेच अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतरच संचालक जिल्हा बँकेच्या सभागृहाकडे रवाना झाले होते.

संचालक मंडळाच्या बैठकीला संचालक मंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माधवराव कानवडे, राहुल जगताप, अमोल राळेभात, प्रशांत गायकवाड, आशा तापकीर, अशोक भांगरे, अनुराधा नागवडे, गणपत सांगळे, विवेक कोल्हे, सीताराम गायकर, अंबादास पिसाळ, अण्णासाहेब म्हस्के, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले हे संचालक उपस्थित होते.

Web Title: Uday Shelke as Chairman of District Co-operative Bank, while Madhavrao Kanwade as Vice Chairman unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.