दोनशे-पाचशेच्या नोटांचा रंग उडतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:39 AM2021-03-04T04:39:44+5:302021-03-04T04:39:44+5:30

अहमदनगर : नव्याने आलेल्या शंभर, दोनशे, पाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटांचा आता रंग उडत आहे. या नोटा फिक्या दिसत ...

Two hundred and five hundred notes are flying | दोनशे-पाचशेच्या नोटांचा रंग उडतोय

दोनशे-पाचशेच्या नोटांचा रंग उडतोय

Next

अहमदनगर : नव्याने आलेल्या शंभर, दोनशे, पाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटांचा आता रंग उडत आहे. या नोटा फिक्या दिसत आहेत. मात्र या नोटा परत करण्यासाठी अद्याप एकही ग्राहक बँकेत आला नाही. याबाबत नगर शहरातील काही प्रमुख बँकांमध्ये चौकशी केली असता तक्रारी नसल्याचे स्पष्ट झाले.

काही जिल्ह्यात नोटांचा रंग फिका झाल्याने त्या बदलून घेण्यासाठी ग्राहक बँकेत येत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये तपासणी केली असता अद्याप अशा तक्रारी नसल्याचे दिसून आले. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद झाल्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने ५०० रुपयांच्या व २००० रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणल्या. मात्र, नोटांच्या कागदाचा दर्जा चांगला नसल्याने २ हजारांच्या नोटा लवकर खराब होत आहेत. रिझर्व्ह बँकेने २०१९-२० या वर्षांत २ हजारांची एकही नवीन नोट छापली नाही. त्यानंतर शंभर रुपयाची निळी, दोनशे रुपयांची पिवळी, पाचशे रुपयांची करडी, दोन हजार रुपयांची गुलाबी नोट निघाली. यातील काही नोटांचा रंग जात असल्याचे अनेकांच्या लक्षात आले आहे. काही नोटांना पाणी लागले तरच त्याचा रंग उडत असल्याचे दिसते आहे.

----------

नोटांसाठी निकृष्ट कागद

नोटाबंदीनंतर घाईघाईत नवीन दोन हजार रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या होत्या. या नोटांसाठी वापरण्यात आलेला कागद अत्यंत निकृष्ट दर्जाचा होता. त्यामुळे त्या लवकर खराब होत आहेत. मात्र, बँकांना ग्राहकांकडून फाटक्या नोटा घेणे बंधनकारक आहे. ग्राहकांना कमिशन एजंटकडे पाठवणे चुकीचे आहे. कोणी तक्रार केली तर रिझर्व्ह बँक त्या बँकेवर कारवाई करू शकते.

------

जिल्ह्यात अद्याप तरी रंग उडाला म्हणून नोटा परत करणाऱ्या ग्राहकांची कुठेच तक्रारी नाहीत. किंवा कोणत्याही बँकेने अद्यापपर्यंत अशा नोटा येत असल्याची माहिती दिली नाही. त्यामुळे जिल्ह्यात अद्याप नोटांचा रंग उडाल्याची एकही तक्रार नाही.

-संदीप वालवलकर, प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक

-------------

Web Title: Two hundred and five hundred notes are flying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.