शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

जामखेड तालुक्यात दोन गटात हाणामारी : आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 7:53 PM

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी दुस-याचे मतदान करू पाहणा-य कार्यकर्त्यांना अडवल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विरोधी कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाणीची घटना मंगळवारी घडली होती.

हळगाव : लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी दुस-याचे मतदान करू पाहणा-य कार्यकर्त्यांना अडवल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विरोधी कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाणीची घटना मंगळवारी घडली होती. या मारहाणीत चौघे जण जखमी झाले होते. बुधवारी उशिरा जामखेड पोलिसांत आठ जणांविरोधात अ‍ॅट्रासिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मित्रजीत भालेराव यांचा मुलगा विश्वजीत भालेराव (वय-23) हा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदान प्रतिनिधी म्हणून पिंपळगाव उंडा येथील मतदान केंद्रावर काम पाहत होता. दरम्यान मतदान प्रक्रिया सुरू असताना गावातील विरोधी गटातील काही लोकांनी दुस-या मतदारांचे मतदान करण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादी विश्वजीत याने आक्षेप नोंदवला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सहका-यांना बेदम मारहाण करून जखमी केले. या मारहाणीत फिर्यादीचे वडिल मित्रजीत भालेराव यांना शिवीगाळ केली. यानंतर रावसाहेब गव्हाणे यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत विश्वजीत भालेराव, मित्रजीत दगडू भालेराव, गणेश हरीदास जगताप व रावसाहेब ज्ञानदेव गव्हाणे (सर्व रा. पिंपळगाव उंडा) हे चौघे जखमी झाले आहेत.या मारहाणप्रकरणी सतिश विक्रम ढगे, उमेश श्रीधर ढगे, गणेश मधुकर ढगे, स्वप्नील बबन मोरे, रंजीत बबन ढगे, विलास घनश्याम मोरे, चत्रभुज घनश्याम मोरे, रमेश बबन ढगे अशा आठ जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला मारहाण, अ‍ॅट्रासिटी तसेच विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कर्जत येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप सातव व पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार हे करत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड