आंबी परिसरात बिबट्याचे दोन बछडे आढळले; वनखात्याने लावला पिंजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 03:54 PM2020-03-29T15:54:55+5:302020-03-29T15:55:43+5:30

राहुरी तालुक्यातील आंबी गावातील शेतकरी रवींद्र कोळसे यांच्या स्वमालकीच्या शेतात गट नं. ७७ मध्ये उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आली आहेत. दरम्यान, बिबट्याची मादी जेरबंद करण्यासाठी वनखात्याने रविवारी पिंजरा लावला आहे. 

Two calf calves were found in the mango area; Cage planted by forest department | आंबी परिसरात बिबट्याचे दोन बछडे आढळले; वनखात्याने लावला पिंजरा

आंबी परिसरात बिबट्याचे दोन बछडे आढळले; वनखात्याने लावला पिंजरा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
राहुरी : राहुरी तालुक्यातील आंबी गावातील शेतकरी रवींद्र कोळसे यांच्या स्वमालकीच्या शेतात गट नं. ७७ मध्ये उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आली आहेत. दरम्यान, बिबट्याची मादी जेरबंद करण्यासाठी वनखात्याने रविवारी पिंजरा लावला आहे. 
            आंबी येथील शेतकरी दीपक कोळसे हे रविवारी सकाळी गायीच्या चाºयासाठी ऊस तोडणी करत असताना त्यांना दोन  बिबट्याची बछडे आढळून आली. यावेळी  तेथे पिलांची आई नसल्यामुळे त्यांच्या जिवीतास हानी पोहाचली नाही. बिबट्याचे बछडे  दिसताच  घाबरलेल्या परिस्थितीत त्यांनी सरपंच अशोक साळुंके, पोलीस पाटील बाळासाहेब लोंढे, पत्रकार संदीप पाळंदे यांना माहिती दिली. काही क्षणात तेथे वनखात्याचे कर्मचारी दाखल झाले. वन अधिकारी एस. एस. चव्हाण, एम. डी. हारदे, एम. एच. पठाण यांना तातडीने बछडे आढळल्याची माहिती दिली. तोपर्यंत बछडे पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. 
         खबर मिळताच वन अधिकारी  एम.डी.हारदे, एम.एच.पठाण काही मिनिटांतच हजर झाले. सरपंच, पोलील पाटील व गावकºयांशी चर्चा केल्यानंतर गांभीर्य ओळखून त्यांनी पिंजरा लावण्याचा निर्णय घेतला.  संक्रापूर येथील जाधव वस्तीवरून लगेच पिंजरा आणून बछडे आढळले त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला. 
       याकामी संक्रापूर येथील शाम जाधव, आंबी येथील गणेश जाधव, विशाल वायदंडे, शाहरुख इनामदार, रवींद्र कोळसे, हरिभाऊ साळुंके, अजय पाळंदे आदींनी सहकार्य केले. 
 

Web Title: Two calf calves were found in the mango area; Cage planted by forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.